विज्ञानही म्हणते, केवळ डोळ्यांनीही होऊ शकतो संवाद!

द़ृष्टी वाचनाची क्षमता मानवी संवादाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग
eye-contact-as-nonverbal-communication-supported-by-science
विज्ञानही म्हणते, केवळ डोळ्यांनीही होऊ शकतो संवाद!Pudhari File Photo
Published on
Updated on

टोरांटो : ‘डोळे हे जुलमी गडे’, ‘इन आँखो की मस्ती के’, ‘आँखो की गुस्ताखीयाँ माफ हो’ वगैरे गाणी आपण ऐकत आलेलो आहे. डोळ्यांचीही एक भाषा असते व त्यामधूनही अचूक संवाद होतो, हे आपल्यालाही माहिती आहे; पण आता यावर विज्ञानानेही शिक्कामोर्तब केले आहे. अलीकडील एका संशोधनात असे आढळले आहे की, माणसे एकमेकांच्या नजरेतील जाणिवा ओळखू शकतात आणि ही द़ृष्टी वाचनाची क्षमता मानवी संवादाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

हे संशोधन ‘कम्युनिकेशन्स सायकोलॉजी’ या शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले. कॅनडामधील मॅकगिल विद्यापीठातील मानसशास्त्र प्राध्यापक जेलेना रिस्टिक यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले. रिस्टिक यांच्या मते, ‘आपले मेंदू सामाजिक माहिती वेगळ्या प्रकारे का प्रक्रिया करतात, याचे कारण शोधणे हे आमचे उद्दिष्ट होते.’ संशोधकांचा मुख्य प्रश्न असा होता की, माणसं जाणीवपूर्वक केलेल्या नजरेच्या हालचालींना आणि अनवधानाने केलेल्या हालचालींना वेगळ्या प्रकारे का प्रतिसाद देतात? प्रथम काही स्वयंसेवकांना स्क्रीनवर दाखवल्या जाणार्‍या सूचना पाहून डोळ्यांची हालचाल करायला सांगितले.

कधी त्यांना डोळे डावीकडे की उजवीकडे फिरवायचे, हे स्वेच्छेने ठरवायला सांगितले, तर कधी ठरावीक दिशेने पाहायला स्पष्टपणे सांगितले गेले. त्यानंतर 80 लोकांना ही व्हिडीओ क्लिप्स दाखवण्यात आली; पण अशा क्षणाला, जेव्हा व्यक्तीने डोळे हलवण्याआधीचे क्षण थांबवलेले होते. प्रेक्षकांना विचारण्यात आले की, पुढे ती व्यक्ती डावीकडे पाहणार की उजवीकडे? निष्कर्ष असा निघाला की, लोक जाणीवपूर्वक नजर हलवण्याच्या वेळी अधिक वेगाने निर्णय घेत होते, काही मिली सेकंदांचा फरक असला, तरी हे सुचवते की, मानवी मेंदू अशा नजरेतील हेतू ओळखतो आणि त्यावर वेगळा प्रतिसाद देतो.

पुढील दोन प्रयोगांमध्ये (सुमारे 70-70 नवीन सहभागींसह) संशोधकांनी पाहिले की, या द़ृष्टिकोनातील हेतूची जाणीव लोकांना दुसर्‍याच्या नजरेच्या दिशेचा पाठपुरावा करण्यावर प्रभाव टाकते का? पण, आश्चर्यकारकरीत्या जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने नजर फिरवण्यात कुठलाही फरक जाणवला नाही. या निष्कर्षावरून हे सूचित होते की, मेंदूत दोन स्वतंत्र प्रक्रिया असू शकतात. एक जी नजर वाचते आणि दुसरी जी तिचा अर्थ लावते किंवा कदाचित नजर वाचल्यानंतर थोड्या वेळाने तिचा हेतू समजून घेतला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news