‘नासा’च्या क्लीन रूममध्ये ‘एक्स्ट्रीमोफाईल’ जीवाणू

ते अवकाशातील निर्वातातही जिवंत राहू शकतील
extremophile-bacteria-found-in-nasa-clean-room
‘नासा’च्या क्लीन रूममध्ये ‘एक्स्ट्रीमोफाईल’ जीवाणूPudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन कंपनी ‘नासा’च्या एका क्लीन रूममध्ये सुमारे 17 वर्षांपूर्वी मंगळावर पाठवण्यात आलेल्या यानाला क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. आता या ‘क्लीन रूम’मध्ये संशोधकांना आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या ‘एक्स्ट्रीमोफाईल’ प्रकारातील जीवाणूंच्या डझनभर नव्या प्रजाती सापडल्या आहेत, असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.

या जीवाणूंमध्ये काही इतके कठीण परिस्थितीत तग धरू शकणारे आहेत की, ते अवकाशातील निर्वातातही जिवंत राहू शकतील, असा संशोधकांचा अंदाज आहे. मात्र, या यानामुळे मंगळावर कोणतेही प्रदूषण झाले असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. नासाचे ‘फिनिक्स मंगळ लँडर’ 25 मे 2008 रोजी मंगळावर उतरले होते आणि 161 दिवस (मंगळावरील 156 दिवस) विविध वैज्ञानिक माहिती संकलित करत होते. मात्र, त्यानंतर यान अचानक बंद पडले.

मंगळावर पोहोचण्याच्या सुमारे 10 महिने आधी, हे यान फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधील ‘पेलोड हॅझर्डस सर्व्हिसिंग फॅसिलिटी’ या क्लीन रूममध्ये काही दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले गेले होते. त्यानंतर 4 ऑगस्ट 2007 रोजी यानाचे प्रक्षेपण केप कॅनव्हेरलमधून करण्यात आले. आता या क्लीन रूममधून यान क्वारंटाईनमध्ये असताना आणि त्याच्या आधी-नंतर घेतलेल्या नमुन्यांचे अलीकडे नव्याने विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये संशोधकांना 26 नव्या जीवाणू प्रजातींचा डीएनए सापडला.

या जीवाणूंमध्ये अत्यंत प्रतिकूल हवामान, तापमान, दाब आणि किरणोत्सर्ग यांना सहन करण्याची क्षमता होती. त्यांच्यामध्ये डीएनए दुरुस्ती, विषारी संयुगांचे डिटॉक्सिफिकेशन आणि ऊर्जा चयापचय सुधारण्याचे जनुकदेखील आढळले. या शोधाचे निष्कर्ष 12 मे रोजी ‘मायक्रोबायोम’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. हा शोध अंतराळातील स्वच्छतेबाबत आणि पृथ्वीबाहेर जीवसृष्टीच्या अस्तित्वाबाबत नव्या शक्यता समोर आणतो. असे सूक्ष्मजीव जर पृथ्वीवर अशा निर्जीव, निर्जंतुकीत ठिकाणीही टिकू शकतात, तर ते अंतराळात देखील तग धरू शकतील, हे नाकारता येत नाही.

‘क्लीन रूम’ म्हणजे काय?

नासाच्या माहितीनुसार, क्लीन रूम म्हणजे अवकाशयान व त्यातील उपकरणे प्रक्षेपणाच्या आधी किंवा पृथ्वीवर परतल्यावर क्वारंटाईन ठेवण्यासाठी तयार केलेल्या उच्चस्तरीय स्वच्छ जागा असतात. या रूम्स अत्यंत स्वच्छ, उच्च दाबाखाली, विशेष प्रकारच्या फिल्टरच्या साहाय्याने हवामुक्त आणि सतत व्हॅक्युम केली जातात. कोणीही आत जाण्यापूर्वी पूर्ण शरीर झाकणारा ‘बनी सूट‘ घालतो आणि एअर शॉवर घेतो. आता अशा ठिकाणी हे जीवाणू आढळले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news