

एक काळ असा होता, जेव्हा संपूर्ण पृथ्वी घनदाट जंगलांनी वेढलेली होती. आज मानवी वस्ती वाढली असली, तरी ही आनंदाची गोष्ट आहे की, आजही पृथ्वीचा अर्ध्याहून अधिक भाग हिरवीगार जंगलं आणि वन्यजीवांच्या ताब्यात आहे. जर तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना जीवनात रोमांच आणि साहस आवडते, तर ही जंगलं तुम्हाला खुले आव्हान देतात. हे केवळ झाडे-झुडपांचे समूह नाहीत, तर त्यांनी मोठमोठी रहस्ये, भयंकर जीव आणि निसर्गाची अनियंत्रित शक्ती स्वतःमध्ये सामावून ठेवली आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील 10 सर्वात धोकादायक आणि रहस्यमय जंगलांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल.
तैगा जंगल : हे जगातील सर्वात मोठे जंगल आहे. ते आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेपर्यंत 1 कोटी 20 लाख वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. हे भारत आणि चीनच्या एकूण क्षेत्रफळापेक्षाही मोठे आहे. उत्तर धुवाजवळ असल्यामुळे ते खूप थंड असते, ज्यामुळे याच्या अनेक भागांमध्ये फक्त बर्फच जमा असतो.
ॲमेझॉन जंगल : जवळपास 70 लाख वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेले हे जंगल, जंगलांचा राजा आणि ‘प्राण्यांचे स्वर्ग’ म्हणून ओळखले जाते. हे जगातील सर्वात मोठे पर्जन्यवन आहे. हे बाझील, पेरू यासह अनेक देशांमध्ये पसरलेले आहे. येथे जगातील सर्वात मोठा ॲनाकोंडा आणि कोट्यवधी भयंकर जीव-जंतू राहतात. सुरक्षेशिवाय येथे फिरणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.
कांगो जंगल : आफ्रिकेतील हे जंगल 20 लाख 23 हजार 428 वर्ग किलोमीटरपेक्षा जास्त भागात पसरलेले आहे. येथे 10,000 हून अधिक प्रकारचे वृक्ष-वनस्पती आणि 500 हून अधिक प्रकारचे प्राणी आढळतात. येथील नदीत पिराना मासासारखे धोकादायक मासे आढळतात, जे मिनिटांमध्ये कोणत्याही व्यक्तीला संपवू शकतात.
सुंदरबन जंगल : भारत आणि बांगला देशच्या दरम्यान पसरलेला हा भाग गंगा आणि बह्मपुत्रा नदीचा डेल्टा प्रदेश आहे. हे जगातील सर्वात मोठे व्याघ प्रकल्प आहे, जिथे वाघ आणि अनेक भयंकर जंगली प्राणी आढळतात. कधी कोणता प्राणी हल्ला करेल, हे सांगता येत नाही. हे एक उत्कृष्ट, पण धोकादायक ठिकाण आहे.
डेंट्री जंगल : ऑस्ट्रेलियामध्ये स्थित, हे जंगल 1200 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेले आहे आणि याला जगातील सर्वात जुने जंगल मानले जाते. हे जितके सुंदर आहे, तितकेच धोकादायकदेखील आहे. कारण, हे जगातील सर्वात विषारी वनस्पती आणि झाडांचे घर आहे.
वाल्डिवियन जंगल : दक्षिण अमेरिकेत (चिली आणि अर्जेंटिना) पसरलेले हे जंगल ‘पर्जन्यवन’ म्हणून ओळखले जाते. कारण, येथे वर्षभर सतत पाऊस पडत असतो. सततच्या आर्द्रतेमुळे हे लाखो कीटक-जंतूंचे घर बनले आहे. येथे अनेक अशा दुर्मीळ प्रजातींच्या वनस्पती आढळतात, ज्या जगात इतरत्र कुठेही नाहीत.
टोंगास जंगल : उत्तर अमेरिकेतील अलास्कामध्ये पसरलेले हे जंगल 68,000 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. येथे 32 आदिवासी गटांचे जवळपास 75,000 हून अधिक लोक राहतात, ज्यांच्यापासून जपून राहणे आवश्यक आहे. धोक्यांनी आणि रोमान्सने भरलेले हे जंगल पाहण्यासाठी 1 कोटीहून अधिक पर्यटक येतात.
किनाबालू जंगल : मलेशियाचे हे जंगल युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. हे डिस्नेलँडप्रमाणे सुंदर, पण खूप भयानक आहे. उंच पर्वतांनी वेढलेल्या या जंगलात 5,000 हून अधिक प्रकारच्या वनस्पती आहेत आणि भयंकर नरभक्षक प्राणी राहतात. रात्रीच्या वेळी हे अधिकच भयानक वाटते.
उष्णकटिबंधीय जंगल : चीनचे हे 2,400 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेले जंगल जैव-संतुलनासाठी खूप महत्त्वाचे आहे. येथे 3,500 हून अधिक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आढळतात. वनस्पतिशास्त्रज्ञांसाठी हे स्वर्ग आहे; पण येथे फिरणे जितके रोमांचक आहे, तितकेच धोकादायकदेखील आहे.
क्लाऊड जंगल : दक्षिण अमेरिकेत स्थित या जंगलाचे नाव ‘मिंडो नांबिलो क्लाऊड फॉरेस्ट’ असे आहे. हे नेहमी ढगांनी वेढलेले असते आणि वर्षभर पाऊस पडतो. ढगांमुळे हे स्वर्गासारखे दिसते; पण सततच्या पावसामुळे हे धोकादायक जलीय कीटकांनी भरलेले असते.