23 Times Earth Mass Planet | तब्बल २३ पृथ्वींएवढ्या वजनाचा, १८ दिवसांचे वर्ष असणारा बाह्यग्रह

 23 Times Earth Mass Planet |
23 Times Earth Mass Planet | तब्बल २३ पृथ्वींएवढ्या वजनाचा, १८ दिवसांचे वर्ष असणारा बाह्यग्रह
Published on
Updated on

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या सौरमालिकेबाहेर एक भलामोठा ग्रह शोधला असून या ग्रहाला ‘जीजे ५२३ बी’ (GJ 523b) असे नाव देण्यात आले आहे. या ग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे तो ‘मेगा-अर्थ’ प्रकारामधील ग्रह आहे. हा एक भरपूर जास्त वजन आणि घनता असलेला ‘एक्सोप्लॅनेट’ म्हणजेच आपल्या सूर्यमालेबाहेरील ग्रह आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने (व्यासाच्या प्रमाणात) सुमारे अडीच पट मोठा असून त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या तुलनेत जवळपास २३ पट अधिक आहे. म्हणजेच तो पृथ्वीपेक्षा २३ पट अधिक जड आहे. अशा मोठ्या आणि अधिक जड ग्रहांना अनौपचारिकपणे ‘मेगा-अर्थ्स’ नावाने संबोधले जाते.

हे असे अवाढव्य वजनाचे ग्रह खडकाळ ग्रहांच्या निर्मितीबाबतच्या पारंपरिक संकल्पनांना छेद देतात. ‘जीजे ५२३ बी’ ची घनता पाहता त्याचे वातावरण तुलनेने विरळ असल्याचे दर्शवते. या एवढ्या मोठ्या आकाराच्या ग्रहाबाबत खगोलशास्त्रज्ञांना सामान्यपणे जी अपेक्षा असते, त्यापेक्षा या ग्रहावरील परिस्थिती वेगळी असल्याचे सध्या तरी सांगितले जात आहे.

सर्वप्रथम नासाच्या ‘ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट’ (TESS) द्वारे ‘जीजे ५२३ बी’ दिसून आला. ॲरिझोनामधील ‘किट पीक नॅशनल ऑब्झर्व्हेटरी’ येथील डब्यूआयव्हायएन 3.5 मीटर दुर्बिणीच्या सहाय्याने केलेल्या निरीक्षणांतून ‘जीजे ५२३ बी’ खरोखरच अस्तित्वात असल्याच्या डेटाला दुजोरा मिळाला. या ग्रहाचे वस्तुमान म्हणजेच वजन पृथ्वीच्या २३.५ पट असून त्रिज्या २.५५ पट मोठी आणि घनता सुमारे १२६.८२ ग्रॅम प्रति घन इंच इतकी असल्याचे संशोधकांना निरीक्षणामधून मिळालेल्या डेटावरून दिसून आले. या ग्रहावरील एक वर्ष १८ दिवसांपेक्षाही कमी वेळाचे आहे. हा ग्रह आपल्या ताऱ्याभोवती दर १७.७५ दिवसांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. हा ग्रह तुलनेने नव्या ग्रहमालिकेचा भाग असून ती साधारण १७ कोटी वर्षांची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news