व्यायामासाठी वेळ मिळत नाही? मग ‘हे’ करा...

तंदुरुस्तीसाठी संतुलित आहार आणि व्यायाम गरजेचा
exercise tips for busy people
Pudhari File Photo
Published on
Updated on

तंदुरुस्तीसाठी संतुलित आहार आणि व्यायाम गरजेचा आहे. आपल्यापैकी अनेकजण फिट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी जिमला जातात. इतकंच नाही, तर काहीजण हेवी वर्कआऊटसोबतच डायटिंगही फॉलो करतात. पण, तुमची रोजची जीवनशैली खराब असेल, तसेच फास्ट फूडचे जास्त सेवन करत असाल, तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी फिट राहता येणार नाही. यासाठी तुमच्या रोजच्या खाण्याच्या सवयींकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का, फिट राहण्यासाठी तुम्ही नियमितपणे सक्रिय राहून आरोग्यामध्ये सुधारणा करू शकता. मात्र, तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसेल, तरीही काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही फिट राहू शकता, असे तज्ज्ञ सांगतात. त्याची ही माहिती...

संतुलित आहार : तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतुलित आहार घेणे. तुमच्या रोजच्या आहारात प्रथिने, कर्बोदके, हेल्दी फॅट, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेल्या गोष्टींचा समावेश करा. ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य नियमित सेवन करा.

पाण्याचे पुरेसे सेवन : स्वतःला शक्य तितके हायड्रेटेड ठेवा. पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच पाण्याचे प्रमाण योग्य राहिल्यास पचन क्रिया चांगली राहते आणि त्वचा हायड्रेट ठेवते. दररोज 8-10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

स्वतःला सक्रिय ठेवा : व्यायाम न करताही तुम्ही स्वतःला सक्रिय ठेवू शकता, जसे की घरातील साफसफाई करणे. अशा हलक्या शारीरिक हालचाली करत राहा. यामुळे तुमच्या कॅलरीज बर्न होतात आणि तुमचे स्नायू मजबूत होतात.

योग आणि ध्यान : मानसिक-शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी योग आणि ध्यान हे देखील चांगले मार्ग आहेत. योगाद्वारे तुम्ही लवचिकता वाढवू शकता, तणाव कमी करू शकता आणि मानसिक शांती मिळवू शकता. हे एकंदर आरोग्यासाठी चांगले आहे, ज्याने तुमचे वजन कमी होऊ शकते.

तुमची झोप पूर्ण करा : शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. 7-8 तासांच्या झोपेमुळे केवळ शरीराचे स्वास्थ्य सुधारत नाही, तर तुमची चयापचय क्रियाही सुधारते. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते आणि शारीरिक थकवादेखील वाढवते. यासाठी पर्याप्त झोप घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news