वॉशिंग्टन : शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता असते हे आपल्याला माहिती आहेच, पण व्यसनमुक्तीसाठीही व्यायाम लाभदायक ठरू शकतो असे संशोधनात आढळलेले आहे. अॅरोबिक व्यायामामुळे अमली पदार्थ आणि मद्याचे व्यसन असणार्यांच्या उपचारात मदत होऊ शकते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.
कार्डिओ म्हणून ओळखल्या जाणार्या अॅरोबिक व्यायाम प्रकारामुळे हृदयाचे स्पंदन आणि श्वासोच्छ्वास वाढतो, त्याचप्रकारे रक्तामध्ये अधिकाधिक ऑक्सिजनचा प्रसार होतो. यामुळे मधुमेह, संधिवात, हृदयरोगांसारख्या आरोग्याच्या इतर समस्यादेखील कमी होत असल्याचे आढळते. यामुळे मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य कमी करण्यातदेखील मदत होते. अमेरिकेतील बफेलो विद्यापीठातील संशोधकांनी अॅरोबिक व्यायामामुळे मेंदूवर होणारा परिणाम आणि त्याचा व्यसनमुक्तीवर पडणारा प्रभाव याचा अभ्यास केला. अॅरोबिक व्यायामामुळे या व्यतिरिक्तदेखील फायदे होत असल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. हा व्यायाम मद्य, निकोटिन, ओपीआइडस् यासारख्या वेगवेगळ्या व्यसनाच्या विविध टप्प्यांवर मदत करू शकतो, असे बफेलो विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक पॅन्योटिस थॅनोस यांनी म्हटले आहे. रोज अॅरोबिक व्यायाम केल्यामुळे मेसोलिम्बिक डोपामाइन प्रक्रियेत बदल होतो. डोपाम चेंतातंतूमध्ये तयार होणारे रसायन व्यसनाशी संबंधित असून काही तरी मिळविल्याची भावना, प्रेरणा आणि शिकण्यासाठी महत्त्वपूर्ण असते. व्यायामामुळे अमली पदार्थामुळे बदल झालेली डोपामाइन संकेत प्रक्रिया सामान्य होऊ शकते. त्याचप्रमाणे याचा उपचारपद्धतीत कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो यावर अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे व्यसनांवर जे अभ्यासकेंद्रित आहेत त्यांनी संशोधकांना व्यसनातून सुटलेल्या लोकांनी पुन्हा व्यसनाकडे न वळण्यासाठी नवी उपचारपद्धती विकसित होऊ शकते.