Mayan Civilization | माया संस्कृतीतील लोकांच्या लाल रंगाच्या अतिवापरामुळे विषारी झाला पाण्याचा साठा

नवीन संशोधनातून धक्कादायक खुलासा
Mayan Civilization |
Mayan Civilization | माया संस्कृतीतील लोकांच्या लाल रंगाच्या अतिवापरामुळे विषारी झाला पाण्याचा साठा
Published on: 
Updated on: 

अलाबामा : प्राचीन माया संस्कृतीतील लोकांनी लाल रंगाचा इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर केला होता की, त्यांच्याच चुकीमुळे त्यांच्या सभोवतालचे तलाव आणि जलमार्ग मर्क्युरीने (पाऱ्याने) विषारी झाले होते, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.

या समूहाच्या समस्येचे मूळ कारण 'सिनाबार' नावाचे खनिज होते. हे एक अतिशय लाल रंगाचे मर्क्युरी-सल्फाईड खनिज असून, लाल रंगाच्या पेंटमध्ये 'व्हर्मीलियन' रंगद्रव्य म्हणून याचा वापर केला जात असे. या पेंटचा सांडपाणी किंवा मातीतील निचरा जलमार्गांमध्ये जात असे, जिथे पाण्यातील जिवाणू (anaerobic bacteria) या सिनाबारचे रूपांतर तलावांच्या तळाशी असलेल्या अत्यंत विषारी 'मिथाइलमर्क्युरी'मध्ये करत असत. कालांतराने, हे मिथाइलमर्क्युरी अन्‍नसाखळीत अधिक प्रमाणात साचत गेले. आजच्या दक्षिण मेक्सिको आणि मध्य आशियामध्ये राहणाऱ्या प्राचीन माया लोकांचे वंशज आजही अस्तित्वात आहेत. हे लोक जवळपास प्रत्येक वस्तू लाल रंगाने रंगवत असत.

पुरातत्त्‍वशास्त्रज्ञांना माया संस्कृतीतील अनेक वस्तू लाल रंगवलेल्या आढळल्या आहेत, ज्यात शिल्पे, स्मारके, भिंती, मैदाने, मातीची भांडी आणि अंत्यसंस्कारासाठी मृतदेह यांचा समावेश आहे. त्यांच्या रंगांमध्ये सिनाबार हे एक सामान्य रंगद्रव्य होते. याशिवाय हेमाटायटी नावाच्या विष नसलेल्या लोह खनिजापासून मिळणारा 'रेड ओचेर' (लाल गेरू) रंगही ते वापरत असत. अलाबामा येथील ऑबर्न युनिव्हर्सिटीचे पेलोलिमिनोलॉजिस्ट (प्राचीन जलमार्गांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ) आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक मॅथ्यू वाटर्स यांनी सांगितले की, लाल रंगाविषयी माया लोकांचे प्रेम होते कारण त्यांच्या मते हा रंग सूर्य, रक्ताचे आणि जीवनाचे प्रतीक होता; परंतु सिनाबारच्या प्रवाहामुळे जवळचे पाणी विषारी झाल्याने एक मोठी पर्यावरणीय आपत्ती ओढवली. ४ नोव्हेंबर रोजी 'सायन्स अडव्हान्सेस' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या भ्यासानुसार, त्यांना सिनाबार पेंटमुळे झालेल्या मर्क्युरी विषबाधेचे स्पष्ट पुरावे आढळले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.