Mammals Birds : सस्तन प्राणी-पक्षी सरपटणाऱ्या प्राण्यांइतके रंगीबेरंगी का नसतात?

जाणून घ्या वैज्ञानिक कारण
Mammals Birds
सस्तन प्राणी-पक्षी सरपटणाऱ्या प्राण्यांइतके रंगीबेरंगी का नसतात?
Published on
Updated on

नवी दिल्ली : निसर्गाच्या दुनियेत पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी आपल्या चमकदार आणि गडद रंगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, सस्तन प्राणी (मैमल) बहुधा तपकिरी, काळ्या किंवा राखाडी रंगातच का दिसतात? सस्तन प्राण्यांच्या अंगावर मोरपंखी निळा किंवा गडद गुलाबी रंगाचा अभाव का असतो, याचा उलगडा एका नवीन संशोधनातून झाला आहे.

रंगांचा अभाव का?

सस्तन प्राण्यांच्या शरीरात पक्षी किंवा माशांसारखे रंग निर्माण करणारे विशिष्ट रंगद्रव्य (पिगमिंटस) किंवा शारीरिक रचनांचा अभाव असतो. पक्ष्यांच्या पिसांमध्ये असणारे स्ट्रक्चरल कलर्स (जे प्रकाशाच्या परावर्तनामुळे निर्माण होतात) सस्तन प्राण्यांच्या केसांच्या रचनेत नसतात. सस्तन प्राण्यांच्या पूर्वजांना शिकार होण्यापासून वाचण्यासाठी किंवा शिकार करण्यासाठी नैसर्गिक वातावरणाशी जुळवून घेणारा रंग अधिक फायदेशीर ठरला. तपकिरी आणि काळा रंग त्यांना झाडे, गवत आणि मातीमध्ये मिसळून जाण्यास मदत करतो. संशोधनानुसार, अनेक सस्तन प्राणी हे रात्रीच्या वेळी सक्रिय असतात. कमी प्रकाशात चमकदार रंग फारसा उपयोग ठरत नाही, त्यामुळे निसर्गाने त्यांना संरक्षणात्मक रंग दिले.

रंगद्रव्यांचे मर्यादित प्रकार

सस्तन प्राण्यांमध्ये प्रामुख्याने मेलानिन हेच रंगद्रव्य असते, ज्यामुळे ते काळ्या, तपकिरी किंवा पिवळ्या रंगाचे दिसतात. पक्ष्यांच्या तुलनेत सस्तन प्राण्यांच्या शरीरात इतर रंगद्रव्ये (उदा. कॅरोटीनॉइडस्‌‍) निर्माण करण्याची क्षमता कमी असते.

पक्ष्यांमध्ये रंगीबेरंगीपणा का असतो?

पक्ष्यांना जोडीदार आकर्षित करण्यासाठी किंवा सामाजिक प्रदर्शनासाठी चमकदार रंगांची गरज असते. पक्ष्यांच्या पिसांची रचना अशी असते की ते प्रकाशाचे विखुरण (स्कॅटरिंग) करून अतिशय तेजस्वी रंग तयार करू शकतात, जी क्षमता सस्तन प्राण्यांच्या केसांमध्ये नसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news