Model Chuando Tan | 60 व्या वर्षीही दिसतो पस्तिशीतील!

Model Chuando Tan | 60 व्या वर्षीही दिसतो पस्तिशीतील!
Published on
Updated on

सिंगापूर : वाढत्या वयासोबत चेहर्‍यावर सुरकुत्या येणे आणि शरीर थकणे स्वाभाविक आहे, पण सिंगापूरचा प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर आणि मॉडेल चुआंडो टॅन याला अपवाद ठरला आहे. 3 मार्च रोजी त्याने आपला 60 वा वाढदिवस साजरा केला; परंतु त्याचे फोटो पाहून तो 60 वर्षांचा आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. सोशल मीडियावर त्याचे तरुण दिसणे आणि फिट बॉडी सध्या जोरदार चर्चेत आहे. तो चक्क पस्तिशीतील तरुणासारखा दिसतो!

आपल्या 60 व्या वाढदिवसानिमित्त चुआंडो टॅनने इन्स्टाग्रामवर 60 फुग्यांसोबतचा एक फोटो शेअर केला. यासोबत त्याने एक भावुक संदेशही लिहिला, ज्यात त्याने ‘वेळ हीच खरी संपत्ती आहे’ असे म्हटले. या पोस्टला काही वेळातच लाखो लाईक्स मिळाले. चाहत्यांनी कमेंट्समध्ये त्याला ’हँडसम आजोबा’ आणि ’व्हॅम्पायर’ (अमर व्यक्ती) अशी टोपण नावे दिली आहेत. एका युजरने गमतीत म्हटले की, ‘हा नक्कीच व्हॅम्पायर असावा, फक्त मी ते सिद्ध करू शकत नाही! चुआंडोच्या मते, त्याच्या या लूकमागे कोणतेही जादूई औषध नसून शिस्तबद्ध जीवनशैली आणि चांगले जीन्स कारणीभूत आहेत. त्याचे गुपित असे आहे: आहार: तो आपल्या कॅलरीजवर बारीक लक्ष ठेवतो. सकाळी प्रोटिन शेक, ओटस्मील, अंडी, मध आणि एवोकॅडो घेतो.

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात प्रामुख्याने वाफवलेले किंवा ग्रिल्ड चिकन/मासे, भात आणि सूपचा समावेश असतो. वर्ज्य गोष्टी: तो दारू, धूम्रपान, कॉफी आणि साखरेच्या पेयांपासून पूर्णपणे लांब राहतो. व्यायाम: आठवड्यातून 3 ते 5 दिवस तो स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ आणि स्विमिंग (पोहणे) करतो. जेवढ्या कॅलरीज तो खातो, तेवढ्याच व्यायामाद्वारे जाळण्यावर त्याचा भर असतो. जरी लोक त्याला ‘एजलेस’ म्हणत असले, तरी टॅन स्वतः मान्य करतो की वाढत्या वयाचा परिणाम त्याला जाणवतो. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत आता फिटनेस टिकवण्यासाठी त्याला जास्त कष्ट घ्यावे लागतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news