Elon Musk | एलन मस्क अंतराळात सोडणार सौरऊर्जेवरील 10 लाख उपग्रह

Elon Musk to Launch 10 Lakh Solar Power Satellites in Space
Elon Musk | एलन मस्क अंतराळात सोडणार सौरऊर्जेवरील 10 लाख उपग्रह
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चालवण्यासाठी लागणारी अफाट वीज, पाणी आणि जागेची कमतरता यावर उपाय म्हणून एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ कंपनीने एक धक्कादायक आणि तितकाच महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मांडला आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांचा वापर टाळण्यासाठी मस्क आता थेट अंतराळात 10 लाख सौरऊर्जेवर चालणारे सॅटेलाईटस् सोडण्याच्या तयारीत आहेत.

सध्या अमेरिका आणि युरोपमध्ये एआय डेटा सेंटर्समुळे होणार्‍या नैसर्गिक संसाधनांच्या हानीबद्दल निषेध व्यक्त केला जात आहे. हे टाळण्यासाठी ‘स्पेस एक्स’ ने अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनकडे 10 लाख सॅटेलाईटस् लाँच करण्यासाठी परवानगी मागितली आहे. हे सॅटेलाईटस् प्रत्यक्षात ‘फ्लोटिंग डेटा सेंटर्स’ म्हणून काम करतील. अंतराळात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या सौरऊर्जेचा वापर करून अवाढव्य ‘कंप्युटिंग पॉवर’ निर्माण केली जाईल. ‘स्पेस एक्स’ चा हा प्रकल्प केवळ तंत्रज्ञानापुरता मर्यादित नसून, तो मानवी संस्कृतीला एका नवीन उंचीवर नेणारा ठरू शकतो.

आपल्या प्रस्तावात कंपनीने ‘कर्दाशेव खख’ स्तराचा उल्लेख केला आहे. ही एक अशी प्रगत संस्कृती असते जी आपल्या तार्‍याची (सूर्याची) संपूर्ण ऊर्जा वापरण्यास सक्षम असते. मस्क यांच्या मते, जर मानवाला दुसर्‍या ग्रहावर वस्ती करायची असेल, तर अंतराळातील अफाट ऊर्जेचा वापर करणे अपरिहार्य आहे. यामुळे मानवी संस्कृती केवळ पृथ्वीपुरती मर्यादित न राहता अंतराळातही विस्तारू शकेल. या महत्त्वाकांक्षी योजनेसमोर अनेक मोठी आव्हाने उभी आहेत :

1. परवानगीचा अडथळा: एफसीसीने नुकतीच 7,500 स्टारलिंक सॅटेलाईटस्ना परवानगी दिली असली, तरी उर्वरित 15,000 वर अद्याप बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत 10 लाख सॅटेलाईटस्ना परवानगी मिळणे कठीण वाटते. 2. स्पेस डेबरी (अंतराळ कचरा): सध्या पृथ्वीभोवती सुमारे 15,000 सॅटेलाईटस् फिरत आहेत. जर लाखो नवीन सॅटेलाईटस् तिथे सोडले, तर अंतराळातील कचरा वाढून सॅटेलाईटस्मध्ये टक्कर होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news