Satellite Data Centers | एलन मस्क अंतराळात उभारणार ‘सॅटेलाईट डेटा सेंटर्स’

गुगल-मेटाला धोबीपछाड देण्याची तयारी
Satellite Data Centers
Satellite Data Centers | एलन मस्क अंतराळात उभारणार ‘सॅटेलाईट डेटा सेंटर्स’ File photo
Published on
Updated on

टेक्सास : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील क्रांती थेट अंतराळात नेण्याच्या तयारीत आहेत. मस्क त्यांच्या स्पेसएक्स आणि xAI या दोन कंपन्यांचे विलीनीकरण करून अंतराळात ‘सॅटेलाईट डेटा सेंटर’ प्रस्थापित करण्याची योजना आखत आहेत. गुगल आणि मेटासारख्या बलाढ्य कंपन्यांना एआय शर्यतीत मागे टाकणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

हे डेटा सेंटर्स म्हणजे अंतराळात फिरणारे शेकडो सॅटेलाईटस् असतील, जे सौरऊर्जेवर चालतील. हे सर्व सॅटेलाईटस् मिळून एक जाळे (नेटवर्क) तयार करतील, जे ‘ग्रोक’ आणि ‘चॅटजीपीटी’सारख्या जड एआय सिस्टिम्स चालवण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड शक्ती प्रदान करतील. पृथ्वीवर डेटा सेंटर्स चालवण्यासाठी अफाट वीज लागते. अंतराळात 24 तास मोफत सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने विजेचा खर्च वाचेल. डेटा सेंटर्समधील मशिन्स थंड ठेवण्यासाठी पृथ्वीवर खूप पैसा खर्च होतो. अंतराळातील नैसर्गिक वातावरण ही उष्णता शोषून घेते, ज्यामुळे कूलिंगचा खर्च शून्य होतो.

तज्ज्ञांच्या मते, अंतराळात डेटा प्रोसेस करणे केवळ स्वस्तच नाही, तर एआयला अधिक वेगवान आणि कार्यक्षम बनवेल. मस्क यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यात काही मोठी आव्हानेदेखील आहेत :

अंतराळातील कचरा : फिरणार्‍या कचर्‍याशी सॅटेलाईटची टक्कर होण्याची भीती.

रेडिएशन : अवकाशातील किरणोत्सर्गापासून नाजूक मशिन्सचे संरक्षण करणे. दुरुस्ती : मशिन्स खराब झाल्यास अंतराळात जाऊन त्यांची दुरुस्ती करणे अत्यंत कठीण आणि महागडे आहे. डॉयचे बँकच्या अंदाजानुसार, 2027-28 पर्यंत केवळ चाचणीसाठी छोटे डेटा सेंटर्स पाठवले जातील. त्यात यश आल्यास 2030 नंतरच मोठ्या स्तरावर हे काम सुरू होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news