Elon Musk Flying Car | एलन मस्क आणणार ‘उडणारी कार’!

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी जो रोगन पॉडकास्टवर वर्षाच्या अखेरपर्यंत उडणार्‍या कारचा प्रोटोटाईप सादर करण्याची धमाकेदार घोषणा केली आहे.
Elon Musk Flying Car
एलन मस्क आणणार ‘उडणारी कार’!(Pudhari File Photo)
Published on
Updated on

वॉशिंग्टन : टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी जो रोगन पॉडकास्टवर वर्षाच्या अखेरपर्यंत उडणार्‍या कारचा प्रोटोटाईप सादर करण्याची धमाकेदार घोषणा केली आहे. मस्क यांनी या तंत्रज्ञानाला इतिहासातील सर्वात अविस्मरणीय उत्पादन लाँच म्हटले असून, हे तंत्रज्ञान जेम्स बॉन्डच्या कारपेक्षाही अधिक वेडेपणाचे असेल, असे सांगितले. या घोषणेमुळे भविष्यातील वाहतूक संकल्पनांमध्ये टेस्लाच्या महत्त्वाकांक्षी पावलावर शिक्कामोर्तब झाले असून, जगभरात उत्सुकता वाढली आहे.

ही चर्चा तेव्हा सुरू झाली, जेव्हा रोगन यांनी टेस्लाच्या बहुप्रतीक्षित दुसर्‍या पिढीच्या रोडस्टर कारबद्दल विचारले, जी 2020 मध्ये लॉन्च करण्याचे उद्दिष्ट होते. रोडस्टरच्या प्रश्नाला थेट उत्तर देण्याऐवजी, मस्क यांनी हळूच नवीन आणि मोठ्या महत्त्वाकांक्षेवर लक्ष केंद्रित केले. मस्क म्हणाले, ‘आम्ही प्रोटोटाईपच्या प्रदर्शनाच्या जवळ पोहोचत आहोत. मी एका गोष्टीची हमी देऊ शकतो की, हा प्रोडक्ट डेमो अविस्मरणीय असेल.’ रोगन यांनी उत्सुकतेने विचारले की हे अविस्मरणीय का असेल, तेव्हा मस्क म्हणाले, ‘ते चांगले असो वा वाईट, ते अविस्मरणीय असेल.’ मस्क यांनी या तंत्रज्ञानाला ‘वेडेपणाचे’ असे वर्णन केले आणि सांगितले की, ‘तुम्ही जेम्स बॉन्डच्या सर्व गाड्या एकत्र केल्या, तरी ही कार त्याहून अधिक वेडेपणाची असेल.’ उडणार्‍या कारच्या संकल्पनेवर जोर देण्यासाठी मस्क यांनी त्यांचे मित्र आणि उद्योजक पीटर थील यांचा उल्लेख केला.

Elon Musk Flying Car
India World Cup Victory Reaction | सोलापूरच्या लेकी म्हणतात, हा विजय खासच..!

मस्क म्हणाले, ‘माझा मित्र पीटर थील एकदा म्हणाला होता की, भविष्यात उडणार्‍या कार असतील; पण आपल्याकडे उडणार्‍या कार नाहीत.’ मस्क यांनी पुढे संकेत दिला, ‘मला वाटते की जर पीटरला उडणारी कार हवी असेल, तर आपण ती विकत घेतली पाहिजे,’ ज्यामुळे टेस्ला या संकल्पनेवर काम करत असल्याचे स्पष्ट झाले. मस्क यांनी आशा व्यक्त केली की, ते ‘वर्षाच्या अखेरपर्यंत’ या उडणार्‍या कारचे प्रदर्शन करू शकतील. तथापि, त्यांनी वाहनाच्या डिझाईनबद्दल (जसे की पंख) कोणतीही तपशीलवार माहिती (विस्तार) देण्यास नकार दिला. ते म्हणाले की, ते ‘अनावरणापूर्वी अनावरण करू शकत नाहीत.’ मस्क यांच्या या विधानांमुळे टेस्लाचे पुढील ‘सर्वात अविस्मरणीय उत्पादन अनावरण’ काय असेल, याबद्दल जगभरात उत्सुकता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news