हत्तीही एकमेकांना ‘नावा’ने ओळखतात!

हत्तीही एकमेकांना ‘नावा’ने ओळखतात!
Elephant
हत्तीही एकमेकांना ‘नावा’ने ओळखतात! pudhari photo

वॉशिंग्टन : ‘नावात काय आहे?’ असे शेक्सपिअरने आपल्या एका नाटकात म्हटले होते. मात्र, नाममहात्म्य काही संपत नाही. केवळ माणसंच नव्हे तर हत्तीही एकमेकांना ‘नावा’ने ओळखतात असे एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे! निसर्गाची अनेक गुपिते मानवाला थक्क करीत असतात. ‘मानव’ हा या पृथ्वीतलावरील बोलणारा एकमेव प्राणी आहे. आपण जसे बोलतो.

बोलण्याच्या माध्यमातून आपण आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवत असतो. परंतु, आपल्यासारखेच इतर प्राणी, पक्षी हे एकमेकांशी संवाद साधत असतात. यांचे अनेक उदाहरणे आपण पहिले आहेत. परंतु, आता नुकत्याच प्रकाशित झालेल्या या नवीन संशोधनानुसार आफ्रिकन हत्ती एकमेकांना हाक मारतात आणि वैयक्तिक नावांना प्रतिसाद देत असल्याची माहिती समोर आली आहे.

हत्ती नावे पुकारताना आपल्या चित्कारण्यातील विविध आवाजांचा वापर करतात लांबवर असलेल्या कळपातील कोणालाही बोलावण्यासाठी विविध नावे वापरतात असे संशोधनात सांगण्यात आले आहे. आपल्याला माहीत आहे की, माणसांना जसे नावे असतात तसेच पाळीव प्राण्यांना नावेदेखील असतात आपण त्यांना हाक मारली ते लगेच धावत येतात. तसेच हत्तीदेखील आपल्या सदस्यांना हाक मारत त्यांच्याशी संवाद साधतात, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. नेचर इकोलॉजी आणि इव्होल्यूशनमधील अभ्यासासाठी, केनियाच्या सांबुरू नॅशनल रिझर्व्ह आणि अंबोसेली नॅशनल पार्कमध्ये रेकॉर्ड केलेल्या हत्तींच्या आवाजाच्या लायब्ररीम ध्ये नावांचा वापर शोधण्यासाठी जीवशास्त्रज्ञांनी मशिन लर्निंगचा वापर केला आहे.

संशोधकांनी जीपमध्ये हत्तींचा पाठलाग करून कोणी हाक मारली आणि कोणी प्रतिसाद दिला याचा शोध घेतला केवळ ऑडिओ डेटाचे विश्लेषण केले. कॉर्नेल विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ मिकी पारडो यांनी अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की,“मानवांप्रमाणेच, हत्तीही नावे वापरतात; परंतु बहुसंख्य उच्चारांमध्ये कधी कधी जास्त नावे वापरत नाहीत, म्हणून आम्ही 100 टक्के अपेक्षा करणार नाही.”

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news