Generate electricity from heat | वाया जाणार्‍या उष्णतेपासून तयार होणार वीज

जपानी वैज्ञानिकांनी शोधले अनोखे तंत्रज्ञान
Generate electricity from heat |
Generate electricity from heat | वाया जाणार्‍या उष्णतेपासून तयार होणार वीज
Published on
Updated on

टोकियो : ऊर्जेची वाढती गरज आणि पर्यावरणाचे रक्षण या दिशेने जपानमधील शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. कारखाने आणि इंजिनांमधून वाया जाणारी उष्णता आता थेट विजेमध्ये रूपांतरित करता येईल, असे तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित केले आहे. साधारणपणे कारखान्यांमधील 20 ते 50 टक्के ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात वाया जाते, जी आता सत्कारणी लागणार आहे.

शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी ‘मॉलिब्डेनम डिसिलिसाइड’ ( MoSi2) नावाच्या एका विशेष पदार्थाचा अभ्यास केला आहे. हा एक ‘थर्मोइलेक्ट्रिक’ पदार्थ आहे, ज्यामध्ये तापमानातील फरकाचे रूपांतर विजेमध्ये करण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही बाह्य चुंबकीय क्षेत्राशिवाय हा धातू अत्यंत अचूकपणे काम करतो, ज्यामुळे भविष्यातील उपकरणांसाठी तो अत्यंत प्रभावी ठरणार आहे. आतापर्यंत वीज निर्मितीसाठी वापरली जाणारी उपकरणे अनेक थरांनी बनलेली असायची, ज्यामुळे विजेच्या प्रवाहात अडथळा येत असे आणि ऊर्जेचे नुकसान व्हायचे. मात्र, शास्त्रज्ञांनी चेडळ2 ची एक पातळ फिल्म तयार केली आहे.

यामुळे ऊर्जेचे नुकसान कमी होते. तसेच कमी खर्चात जास्त वीज निर्मिती शक्य होते. मोठ्या क्षेत्रावर याचा वापर करता येतो. या प्रक्रियेला शास्त्रज्ञांनी अऊउझ असे नाव दिले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा या पदार्थाचे एक टोक गरम आणि दुसरे टोक थंड ठेवले जाते, तेव्हा त्यातील इलेक्ट्रॉन्स गरम टोकाकडून थंड टोकाकडे वेगाने धावू लागतात. या हालचालीमुळे व्होल्टेज निर्माण होतो आणि वीज तयार होते. हे संशोधन केवळ मोठ्या कारखान्यांपुरते मर्यादित नाही, तर याचे अनेक फायदे आहेत.

पोर्टेबल सेन्सर्स : छोटे सेन्सर्स चालवण्यासाठी याचा वापर करता येईल. दुर्गम भाग : ज्या भागात वीज पोहोचवणे कठीण आहे, तिथे उष्णतेचा वापर करून उपकरणे स्वतःला चार्ज ठेवू शकतील. प्रदूषण मुक्त ऊर्जा : हे तंत्रज्ञान पूर्णपणे शाश्वत आणि प्रदूषणविरहित आहे. जपानच्या शास्त्रज्ञांचे हे संशोधन ‘कम्युनिकेशन्स मटेरियल्स’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. यामुळे भविष्यात जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन स्वच्छ आणि हरित ऊर्जेकडे आपली वाटचाल सुलभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news