

वॉशिंग्टन : अमेरिकेतील इंजिनिअर्सनी एक मोठे यश मिळवले आहे, ज्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांना रस्त्यावर धावत असतानाच चार्ज करणे शक्य होणार आहे. त्यांनी या प्रणालीची यशस्वी चाचणीदेखील घेतली आहे. या चाचणीत एका अवजड इलेक्ट्रिक ट्रकला हायवेवर धावत असताना वायरलेस पद्धतीने चार्ज करण्यात आले. या यशस्वी चाचणीमुळे भविष्यात वाहतूक अधिक कार्यक्षम आणि स्वस्त होईल, तसेच इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करणे खूप सोपे होईल.
इंटरेस्टिंग इंजिनिअरिंगच्या अहवालानुसार, ही चाचणी इंडियानामधील वेस्ट लाफायेट येथील यू.एस. हायवे 52/231 च्या एक चतुर्थांश मैलाच्या भागावर करण्यात आली. पर्ड्यू विद्यापीठाच्या संशोधकांनी हायवेच्या काँक्रिटखाली एक विशेष डायनॅमिक वायरलेस पॉवर ट्रान्स्फर सिस्टीम बसवली होती. याच सिस्टीमने इलेक्ट्रिक ट्रकला चालू असताना चार्ज केले. या चाचणीसाठी र्उीााळपी उश्ररीी 8 इलेक्ट्रिक सेमी-ट्रक (अवजड ट्रक) या कॉईल सिस्टीमवरून ताशी 65 मैल वेगाने चालवण्यात आला. अहवालानुसार, ट्रकने चालू असताना प्रभावीपणे 190 किलोवॅट वीज खेचली. ही वीज सुमारे 100 सामान्य घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विजेच्या समान आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, हा निकाल सिद्ध करतो की ज्या संकल्पनेची दीर्घकाळापासून कल्पना केली जात होती, ती आता केवळ शक्यच नाही, तर मोठ्या प्रमाणावर लागूदेखील केली जाऊ शकते.
या सिस्टीममध्ये रस्त्याच्या खाली ट्रान्समीटर कॉईल्स बसवलेले असतात, जे एक चुंबकीय क्षेत्र तयार करतात. इलेक्ट्रिक सेमी-ट्रकमध्ये रिसीव्हर कॉईल्स ट्रकच्या चेसिसखाली बसवलेले असतात. जेव्हा ट्रक या कॉईल्सवरून जातो, तेव्हा वीज रस्त्याद्वारे थेट ट्रकमधील बॅटरी सिस्टीममध्ये हस्तांतरित होते. ट्रकमधील रिसीव्हर ही वीज खेचतो, ज्यामुळे बॅटरी चार्ज होते. या कॉईल्स खास करून काँक्रीटच्या रस्त्याच्या आत काम करण्यासाठी डिझाईन केल्या आहेत. कारण, अमेरिकेतील बहुतेक व्यस्त महामार्ग काँक्रीटचेच बनलेले आहेत.