‘हे’ इलेक्ट्रिक वाहन सौरऊर्जेवर धावणार 64 किलोमीटर; एकूण रेंज 640 कि.मी.

electric vehicle powered by solar energy 64 km range
‘हे’ इलेक्ट्रिक वाहन सौरऊर्जेवर धावणार 64 किलोमीटर; एकूण रेंज 640 कि.मी.Pudhari File Photo
Published on
Updated on

लास वेगास : सध्या अमेरिकेच्या लास वेगासमध्ये कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2025 सुरू आहे. त्यामध्ये एका इलेक्ट्रिक वाहनाचे प्रोटोटाईप सादर करण्यात आले. ही इलेक्ट्रिक गाडी केवळ सौरऊर्जेचा वापर करून दिवसभरात 64 किलोमीटर अंतरापर्यंत धावू शकते. या सोलर-पॉवर्ड कारचे नाव ‘अ‍ॅपटेरा लाँच एडिशन’ असे आहे. एका इलेक्ट्रिकल आऊटपुटच्या सिंगल चार्जने ती 640 किलोमीटरची रेंज देते हे विशेष!

या कारचे आता व्यावसायिक उत्पादन केले जाणार आहे. आता ‘सीईएस 2025’ मध्य प्रथमच ही कार दाखवण्यात आली आहे. ही एअरोडायनॅमिक कार कार्बन फायबर शीट मोल्डिंग कम्पाऊंड (सीएफ-एसएमसी) पासून बनवण्यात आली आहे. हे एक कम्पोझिट मटेरियल आहे जे कापलेल्या कार्बन फायबर्सपासून व थर्मोसेटिंग रेझिनपासून बनवले जाते. या कारच्या डिझाईनमध्ये चार सोलर पॅनेल्स आहेत जे कारच्या हूड, डॅश, रुफ आणि हॅचवर बसवले जातात. मोटारीच्या पारंपरिक डिझाईनच्या तुलनेत केवळ एक दशमांश भाग या कारसाठी लागतात हे विशेष! केवळ सहा महत्वाचे बॉडी कम्पोनंटस् चेसिस बनवतात. त्यामुळे हे वाहन वजनाने हलके होते आणि पारंपरिक इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत ऊर्जेची अधिक बचत करणारे ठरते. ते एअरोडायनॅमिक रेझिस्टन्सला 50 टक्क्यांपर्यंत घटवते. 100 वॅट-अवर्स पर माईल इतकी ऊर्जेची बचत या कारमुळे होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news