Egypt Golden City | इजिप्तमध्ये सापडले तीन हजार वर्षांपूर्वीचे ‘सोन्याचे शहर’

Egypt Golden City
Egypt Golden City | इजिप्तमध्ये सापडले तीन हजार वर्षांपूर्वीचे ‘सोन्याचे शहर’File Photo
Published on
Updated on

कैरो : जगभरातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ हजारो वर्षांपूर्वीच्या कलाकृतींचा शोध घेत आहेत. अशातच इजिप्तमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या पथकाने मोठे संशोधन केले आहे. संशोधकांना 3,000 वर्षे जुने ‘सोन्याचे शहर’ सापडले आहे, जिथे एकेकाळी सोन्याचे खाणकाम केले जात असे. इजिप्तच्या भूद़ृश्याने जगभरातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांना भुरळ घातली आहे. हजारो वर्षे जुन्या संस्कृतीचे घर असलेल्या या देशात अजूनही असंख्य रहस्ये आहेत. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी त्याच्या मातीत खोलवर दडलेले असेच एक रहस्य उलगडले आहे. अनेक वर्षांच्या बारकाईने उत्खननानंतर त्याचे पुनर्संचयितीकरण आता पूर्ण झाले आहे.

2021 मध्ये इजिप्तशास्त्रज्ञांना ‘हरवलेले सुवर्ण शहर’ असे म्हटले जाणारे शहर सापडले होते. त्यावेळेपासून तिथे हे संशोधन सुरू होते. इजिप्तच्या लाल समुद्रातील गव्हर्नरेटमधील मार्सा आलमच्या नैऋत्येस असलेले जबल सुक्री हे ठिकाण 1000 इ.स.पूर्व पासून औद्योगिक क्रियाकलापांचे केंद्र होते. अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की, सोन्याच्या खाणकाम आणि प्रक्रियेत या जागेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, ज्यामध्ये सोने काढण्यासाठी रचना करण्यात आल्या होत्या.

पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या जागेला अलीकडच्या काळात झालेल्या सर्वात मोठ्या पुरातत्त्वीय शोधांपैकी एक म्हटले आहे. इजिप्तच्या सर्वोच्च पुरातन वास्तू परिषदेचे सरचिटणीस डॉ. मोहम्मद इस्माईल खालेद म्हणाले की, उत्खननात सोन्याच्या प्रक्रिया स्थळाचे अवशेष आढळले आहेत. ज्यामध्ये दळणे आणि क्रशिंग स्टेशन, गाळण्याचे बेसिन आणि सोने वितळवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मातीच्या भट्ट्यांचा समावेश आहे. या संशोधानवरून असे दिसून येते की, हे ठिकाण इजिप्तच्या प्राचीन सोन्याच्या व्यापाराचा एक महत्त्वाचा भाग होता. या ठिकाणी टॉलेमिक काळातील नाणीदेखील सापडली आहेत, ज्यावरून असे सूचित होते की, हे ठिकाण बराच काळ सक्रिय होते.

इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री शेरीफ फाथी म्हणाले की, उत्खननामुळे प्राचीन इजिप्शियन खाण कामगारांच्या अभियांत्रिकी आणि तांत्रिक कौशल्यावर प्रकाश पडतो, ज्यांनी कठोर वाळवंटातील लँडस्केपमध्ये सोने काढण्यासाठी अत्याधुनिक पद्धती विकसित केल्या. डॉ. खालेद यांनी अधोरेखित केले की, ग्राइंडिंग आणि चाळणी केंद्रांचे अवशेष दाखवतात की, इजिप्शियन लोकांनी क्वार्ट्जपासून सोने वेगळे करण्याची प्रक्रिया कशी पारंगत केली. सोने वितळवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मातीच्या भट्ट्यांचा शोध पुष्टी करतो की, हे ठिकाण केवळ खाण चौकीच नव्हते, तर पूर्णपणे कार्यरत प्रक्रिया केंद्रदेखील होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news