Head and neck cancer vaccine | डोके, मानेच्या कर्करोगाविरुद्ध प्रभावी लस विकसित

Head and neck cancer vaccine
Head and neck cancer vaccine | डोके, मानेच्या कर्करोगाविरुद्ध प्रभावी लस विकसित
Published on
Updated on

वॉशिंग्टन : ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ (कझत) मुळे होणार्‍या डोके आणि मानेच्या कर्करोगाशी लढण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या एका नवीन लसीने प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये आशादायक निकाल दाखवले आहेत. मानवी उती आणि उंदरांवर केलेल्या या अभ्यासाचे परिणाम सकारात्मक असून, भविष्यात ही लस कर्करोग उपचारात क्रांती घडवू शकते.

‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, ही एक ‘थेरप्युटिक लस’ (उपचारात्मक लस) आहे. प्रतिबंधात्मक लसी या आजार होऊ नये म्हणून दिल्या जातात. मात्र, ही लस आधीच कर्करोग झालेल्या रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगाच्या पेशी ओळखून त्यांच्याशी लढण्यासाठी प्रशिक्षित करते. जरी 100 हून अधिक प्रकारचे कझत विषाणू असले, तरी त्यातील 12 प्रकार कर्करोगासाठी ‘हाय-रिस्क’ मानले जातात. अमेरिकेतील घशाच्या कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी 70 टक्के प्रकरणे ही कझत मुळे होतात.

यामध्ये प्रामुख्याने कझत-16 हा घटक कारणीभूत असतो. सध्या बाजारात उपलब्ध असलेली ‘गार्डासिल 9’ ही लस संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी आहे. परंतु, ज्यांना आधीच ट्यूमर झाला आहे, त्यांना शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपीवरच अवलंबून राहावे लागते. संशोधकांनी या लसीची रचना एका विशिष्ट पद्धतीने केली आहे, ज्यामध्ये ‘अ‍ॅडजुव्हंटस्’ चा वापर करून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते. प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये या लसीने : 1. उंदरांमधील ट्यूमरची वाढ मंदावल्याचे दिसून आले. 2. कर्करोगग्रस्त उंदरांचा जगण्याचा कालावधी वाढल्याचे सिद्ध झाले.

‘जर ही लस मानवांमध्ये प्रभावी ठरली, तर ती सध्याच्या मानक उपचार पद्धतींना (शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी) एक उत्तम जोड देऊ शकेल,’ असे युसी सॅन डिएगो हेल्थचे तज्ज्ञ डॉ. एझरा कोहेन यांनी स्पष्ट केले. ही लस केवळ डोके आणि मानेच्या कर्करोगासाठीच नाही, तर इतर आजारांसाठी देखील अधिक चांगल्या लसी विकसित करण्यास शास्त्रज्ञांना मदत करू शकते. जर मानवी चाचण्या यशस्वी झाल्या, तर कर्करोग पुन्हा उद्भवण्यापासून रोखण्यासाठी ही लस मैलाचा दगड ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news