

वॉशिंग्टन : एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. एका व्यक्तीने एलन मस्क यांची श्रीमंतीची मिरासदारी धोक्यात आणली आहे. या व्यक्तीने एका रात्रीत 2453292820000 रुपयांची बंपर कमाई केली आहे. यावर्षी एलन मस्क यांची एकूण संपत्ती 59.4 अब्ज डॉलर्सने घसरली आहे. असे असूनही, ते 373 अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या खुर्चीवर बसले आहेत; परंतु ही परिस्थिती लवकरच बदलू शकते.
एलन मस्क यांची श्रीमंती लॅरी एलिसन यांच्यामुळे धोक्यात आली आहे. लॅरी एलिसन यांची एकूण संपत्ती झपाट्याने वाढत आहे. ब्लूमबर्ग बिलियनने अर्स इंडेक्सनुसार, सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे संस्थापक एलिसन यांची एकूण संपत्ती मंगळवारी 28.4 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 2453292820000 रुपयांनी वाढली आहे. यासह त्यांची एकूण संपत्ती 289 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. जर त्यांची एकूण संपत्ती याच वेगाने वाढत राहिली तर ते तीन दिवसांत मस्क यांना मागे टाकू शकतात.
मस्क आणि एलिसन यांच्या एकूण संपत्तीत सध्या 84 अब्ज डॉलर्सचा फरक आहे. या वर्षी एलिसनची एकूण संपत्ती 96.8 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. 80 वर्षीय एलिसन यांचा ओरेकल या महाकाय टेक कंपनीमध्ये सुमारे 40 टक्के हिस्सा आहे. जवळजवळ 37 वर्षे कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर, त्यांनी 2014 मध्ये सीईओ पद सोडले. त्यांनी डिसेंबर 2018 ते ऑगस्ट 2022 पर्यंत टेस्लाच्या बोर्डावरही काम केले. एलिसन यांनी 2012 मध्ये हवाईमध्ये 300 दशलक्ष डॉलर्समध्ये एक बेट विकत घेतले आणि 2020 मध्ये तेथे कायमचे स्थलांतर झाले. श्रीमंतांच्या यादीत आणखी एक उलटफेर दिसून आली आहे.
फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्सचे सीईओ मार्क झुकेरबर्ग आता या यादीत चौथ्या स्थानावर आले आहेत. मंगळवारी त्यांची एकूण संपत्ती 2.79 अब्ज डॉलर्सने घसरली आणि ती 248 अब्ज डॉलर्सवर राहिली. आता अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी त्यांना मागे टाकले आहे. त्यांची एकूण संपत्ती 249 अब्ज डॉलर्स आहे आणि ते श्रीमंतांच्या यादीत तिसर्या स्थानावर पोहोचले आहेत. या यादीत स्टीव्ह बाल्मर (173 अब्ज डॉलर्स) चौथ्या, लॅरी पेज (172 अब्ज डॉलर्स) पाचव्या, सर्गेई ब्रिन (161 अब्ज डॉलर्स) सहाव्या, बर्नार्ड अरनॉल्ट (155 अब्ज डॉलर्स), जेन्सेन हुआंग (146 अब्ज डॉलर्स) आणि वॉरेन बफे (143 अब्ज डॉलर्स) 10 व्या क्रमांकावर आहेत. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी 102 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत 17 व्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानी 83.4 अब्ज डॉलर्ससह 20 व्या क्रमांकावर आहेत.