चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी ग्रेट ब्ल्यू होलमध्ये ड्रिलिंग!

कॅरिबियनमधील उष्णकटिबंधीय चक्रीवादळे अधिक वारंवार होत आहेत
drilling-in-great-blue-hole-to-study-hurricanes
चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी ग्रेट ब्ल्यू होलमध्ये ड्रिलिंग!Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी संशोधकांनी ग्रेट ब्ल्यू होल या नावाने प्रसिद्ध असलेल्या समुद्रातील विवरात ड्रिलिंग करून तेथील गाळाचे नमुने घेतले आहेत. ग्रेट ब्ल्यू होलच्या तळाशी सापडलेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की, कॅरिबियनमधील उष्णकटिबंधीय चक्रीवादळे अधिक वारंवार होत आहेत आणि पुढील काही दशकांत त्यांची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढू शकते.

संशोधकांनी बेलिझच्या किनार्‍यापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रेट ब्ल्यू होलमधून गाळाचा नमुना घेतला. या अभ्यासात असे आढळले की, गेल्या 5,700 वर्षांपासून उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या वारंवारतेत वाढ होत आहे. हा शोध ‘जिऑलॉजी’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये 14 मार्च रोजी प्रकाशित करण्यात आला. आमच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे गेल्या 5,700 वर्षांपासून वादळांची वारंवारिता सतत वाढत आहे, असे या अभ्यासाचे प्रमुख संशोधक डॉमिनिक श्मिट यांनी सांगितले. विशेष म्हणजे, गेल्या दोन दशकांत या भागात वादळे येण्याचे प्रमाण गेल्या सहा हजार वर्षांच्या तुलनेत अधिक आहे, याचा स्पष्ट संबंध आधुनिक जागतिक तापमानवाढीशी आहे.

उष्णकटिबंधीय चक्रीवादळे ही तीव्र, फिरणारी, कमी दाबाची प्रणाली असते, जी उष्ण महासागरावर तयार होते आणि महासागरातील उष्णता वातावरणाच्या वरच्या थरांमध्ये स्थानांतरित करते. या वादळांमुळे जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि सुनामीसारख्या लाटा निर्माण होतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. या वादळांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी संशोधकांनी ग्रेट ब्ल्यू होलच्या 125 मीटर खोल तळाशी असलेल्या गाळाचा 30 मीटर लांबीचा नमुना घेतला. हा नमुना या भागातील उष्णकटिबंधीय वादळांचा सर्वात प्रदीर्घ सातत्यपूर्ण नोंद असलेला नमुना आहे.

गाळाच्या थरांचे विश्लेषण करून, संशोधकांना गेल्या 5,700 वर्षांमध्ये किती उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आली, हे निश्चित करता आले. प्रत्येक वर्षी नैसर्गिक गाळाचे दोन थर तयार होतात, यामुळे संशोधकांना झाडाच्या वर्तुळांसारखी गणना करून वादळांचे कालखंड निश्चित करता आले. संशोधकांना असे आढळले की, औद्योगिक क्रांतीनंतर जीवाश्म इंधन जाळण्यास सुरुवात झाल्यापासून या चक्रीवादळांची वारंवारिता विशेषतः वाढली आहे. गेल्या सहा हजार वर्षांत दर शतकाला चार ते सोळा उष्णकटिबंधीय वादळे ग्रेट ब्ल्यू होलवरून गेली आहेत, असे श्मिट यांनी सांगितले. मात्र, गेल्या केवळ 20 वर्षांतच या भागातून नऊ उष्णकटिबंधीय वादळे गेल्याचे पुरावे संशोधकांना मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news