Volcano Eruption Prediction | मृत ज्वालामुखी तब्बल १ लाख वर्षांनंतर पुन्हा जिवंत होणार?

नवीन संशोधनाने शास्त्रज्ञ चिंतेत
Volcano Eruption Prediction |
Volcano Eruption Prediction | मृत ज्वालामुखी तब्बल १ लाख वर्षांनंतर पुन्हा जिवंत होणार?
Published on
Updated on

झुरिच : गेल्या १०,००० वर्षांत एकही उद्रेक न झाल्यामुळे 'मृत' घोषित करण्यात आलेले ज्वालामुखी प्रत्यक्षात पूर्णपणे मृत नसून, ते केवळ एका दीर्घकालीन सुप्त अवस्थेत असू शकतात, असा खळबळजनक खुलासा एका नवीन वैज्ञानिक संशोधनातून झाला आहे. या संशोधनामुळे ज्वालामुखींच्या वर्गीकरणावर आणि त्यांच्या देखरेखीवर आता जगभरात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वित्झर्लंडमधील 'ईटीएच झुरिच' (या संस्थेचे संशोधक रॅझवान-गॅब्रिएल पोपा आणि त्यांच्या टीमने अथेन्स (ग्रीस) जवळील 'मेथाना' ज्वालामुखीचा सखोल अभ्यास केला. शास्त्रज्ञांनी मेथाना ज्वालामुखीच्या खडकांमध्ये आढळणाऱ्या 'झिरकॉन' स्फटिकांचे रासायनिक आणि कालमापन विश्लेषण केले. यातून असे समोर आले की, भूतकाळात हा ज्वालामुखी सुमारे १ लाख १० हजार वर्षे (२,८०,००० ते १,६८,००० वर्षांपूर्वीचा काळ) पूर्णपणे शांत होता. सर्वांना तो मृत वाटत असतानाच, अचानक १ लाख ६८ हजार वर्षांपूर्वी तो पुन्हा प्रचंड वेगाने सक्रिय झाला आणि तिथून लाव्हा बाहेर पडू लागला.

जमिनीखाली मॅग्माचा संचय

सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या ज्वालामुखीचा गेल्या १०,००० वर्षांत उद्रेक झाला नसेल, तर त्याला 'मृत' मानले जाते. परंतु, मेथाना ज्वालामुखीच्या इतिहासामुळे हा निकष चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या मते, वरून शांत दिसणाऱ्या अनेक ज्वालामुखींच्या खाली शेकडो किलोमीटर खोलवर 'मॅग्मा' (वितळलेला खडक) आणि वायूंचा दाब हळूहळू वाढत असतो. फक्त मेथानाच नाही, तर रोमानियातील 'सिओमाडुल' आणि इराणमधील 'ताफ्तान' यांसारख्या मृत मानल्या गेलेल्या ज्वालामुखींच्या खालीही अद्याप मॅग्मा सक्रिय असल्याचे आणि जमिनीची हालचाल होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच, २०२५ मध्ये इथिओपियातील 'हायली गुब्बी' ज्वालामुखीचा झालेला अचानक उद्रेक हे याचे ताजे उदाहरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news