Donald Trump AI Photo | ट्रम्पना वाटते, ‘तिथे’ आपलाही असावा चेहरा!

Donald Trump AI Photo |
Donald Trump AI Photo | ट्रम्पना वाटते, ‘तिथे’ आपलाही असावा चेहरा!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका ‌‘एआय‌’ फोटोच्या माध्यमातून आपली एक सुप्त इच्छा जाहीर केली आहे. हा फोटो एका पर्वताचा आहे, जिथे आधीपासूनच चार चेहरे कोरलेले दिसत आहेत आणि अगदी उजव्या कोपऱ्यात ट्रम्प यांचाही परिचित चेहरा पाहायला मिळतो. अर्थातच हे प्रसिद्ध शिल्प जगभरातील अनेक लोकांना ठाऊक आहे. येथे अमेरिकेच्या चार दिवंगत राष्ट्राध्यक्षांचे चेहरे कोरलेले आहेत. आता ट्रम्प महाशयांना त्यांच्या पंक्तीत बसण्याची इच्छा आहे! शांततेचा नोबेल पुरस्कार काही ट्रम्प यांना मिळाला नाही. मात्र, त्यांचे हे स्वप्न पूर्ण होते का हे पाहायचे!

ट्रम्प यांनी त्यांच्या ‌‘ट्रूथ सोशल‌’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जो फोटो शेअर केला आहे, तो ‌‘एआय‌’द्वारे तयार करण्यात आला आहे. परंतु, या फोटोमधून ट्रम्प यांना बाजूला केले, तर उर्वरित डोंगर आणि त्यावरील चेहरे पूर्णपणे खरे आहेत. त्यांच्या शेजारी दिसणारे चार चेहरे कोणत्याही सामान्य व्यक्तींचे नसून, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थियोडोर रूझवेल्ट आणि अबाहम लिंकन यांचे आहेत. हे ठिकाण अमेरिकेच्या साऊथ डकोटा प्रांतातील सुंदर अशा ‌‘ब्लॅक हिल्स‌’मध्ये आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या जागेवर देशाच्या चार दिग्गज नेत्यांचे भव्य चेहरे कोरण्यात आले आहेत, ज्याला ‌‘माऊंट रशमोर‌’ असे म्हटले जाते.

हे ठिकाण अमेरिकेचा जन्म, विकास, प्रगती आणि संरक्षणाचा इतिहास सांगते. आता डोनाल्ड ट्रम्प यांचीही अशीच इच्छा आहे की, माऊंट रशमोरवर त्यांचाही चेहरा कोरला जावा! साऊथ डकोटाच्या कीस्टोनमधील ‌‘ब्लॅक हिल्स‌’च्या ग्रॅनाईट खडकांवर हे भव्य चेहरे कोरण्यात आले आहेत. ‌‘माऊंट रशमोर नॅशनल मेमोरियल‌’अंतर्गत येणाऱ्या या ऐतिहासिक स्थळावर चार माजी राष्ट्राध्यक्षांचे हे तब्बल ६० फूट उंचीचे चेहरे आहेत. शिल्पकार गुटझोन बोर्ग्लम यांनी अमेरिकन इतिहासाची पहिली १५० वर्षे अधोरेखित करण्यासाठी या विशिष्ट राजकारण्यांची निवड केली होती. या राष्ट्रीय स्मारकात डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा समाविष्ट करण्याचा विचार २०१८ मधील एका चर्चेतून समोर आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news