Dolly Chaiwala new car | डॉली चायवाल्यानं घेतली ३२ लाखांची कार!

Dolly Chaiwala new car |
Dolly Chaiwala new car | डॉली चायवाल्यानं घेतली ३२ लाखांची कार!
Published on: 
Updated on: 

नागपूर : डॉली चायवाला म्हणजे चहाच्या टपरीवरून थेट सेलिब्रिटीच्या दुनियेत पोहोचलेलं एक भन्‍नाट व्यक्तिमत्त्‍व. नागपूरच्या टपरीवर चहा विकताना त्याने आपली सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या हटके अंदाजाने सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक चाहत्यांचे मन वेधून घेतले होते. त्याची चहा बनवण्याची-विकण्याची स्टाईल, हेअरस्टाईल यामुळे तो सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झाला. आता हाच डॉली चायवाला पु्न्हा एकदा चर्चेत आलाय तो त्याच्या नव्या कोऱ्या कारमुळे. त्याने तब्बल ३२ लाख रुपयांची कार खरेदी केली आहे!

त्याची एन्ट्री पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये डॉली चायवाला ऑटो रिक्षातून कारच्या शोरूममध्ये पोहोचताना दिसतोय. शोरूममध्ये पोहोचल्यानंतर तो कागदांवर सही करतो. त्यानंतर आपल्या नव्या कारची डिलिव्हरी घेतो. कार लाल कपड्याने झाकलेली व्हिडीओमध्ये दिसते आहे. त्यानंतर ही आलिशान कार समोर येते. नवी कार घेण्यासाठी शोरूममध्ये येताना डॉलीने ऑटो रिक्क्षाने प्रवास केला. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या साधेपणाची आणि स्टाईलची चर्चा सुरू आहे. काही जण याला साधेपणा म्हणत आहेत तर काहींना हा डॉलीला ट्रोल करत आहेत. डॉलीच्या या व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी याला नव्या कारसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news