Dogs Read Facial Expressions | फक्त चेहरा पाहून माणसाचा मूड ओळखतात कुत्रे!

वैज्ञानिकांच्या नवीन अभ्यासातून रंजक माहिती समोर
Dogs Read Facial Expressions |
Dogs Read Facial Expressions | फक्त चेहरा पाहून माणसाचा मूड ओळखतात कुत्रे!
Published on
Updated on

नवी दिल्ली : जर तुम्ही कुत्रा पाळला असाल आणि तुम्हाला कधी असे वाटले असेल की तुमचा कुत्रा तुमच्या मनातले ओळखतो, तर तुम्ही अगदी बरोबर आहात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. या अभ्यासानुसार, कुत्रे खरोखरच माणसाचा मूड चांगला आहे की वाईट, हे अचूकपणे ओळखू शकतात.

वैज्ञानिक नुकत्याच केलेल्या एका अभ्यासाद्वारे कुत्र्यांच्या मेंदूची कार्यपद्धती समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये असे दिसून आले की, कुत्रे केवळ तुम्ही दुःखी आहात एवढेच पाहत नाहीत; तर ते आनंद, हास्य, राग आणि इतर अनेक भावनांमधील फरक अतिशय सहजपणे ओळखू शकतात. ‘सेल प्रेस’ नियतकालिकात प्रकाशित झालेला हा अभ्यास सांगतो की, कुत्र्यांमध्ये मानवी भावना समजून घेण्याची आणि त्यातील फरक ओळखण्याची विलक्षण क्षमता असते. संशोधकांनी हा अभ्यास ८ कुत्र्यांवर केला.

कुत्र्यांच्या मेंदूमध्ये नक्की काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी प्रथम आपले संपूर्ण लक्ष आनंदाच्या भावनांवर केंद्रित केले. त्या ८ कुत्र्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग करताना त्यांच्यासमोर पूर्णपणे अनोळखी असलेल्या व्यक्तींचे हसरे किंवा सर्वसामान्य चेहरे असलेले फोटो ठेवण्यात आले. फोटो पाहिल्यानंतर कुत्र्यांच्या मेंदूतील ते भाग सक्रिय झाले, जे उत्कृष्ट विचारक्षमता आणि रिवॉर्ड प्रोसेसिंगशी संबंधित असतात. यामध्ये टेम्पोरल कॉर्टेक्स आणि कॉडेट न्यूक्लियस यांसारख्या मेंदूच्या भागांचा समावेश होता.

कुत्रे मानवी भावना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम आहेत याचा अर्थ असा नाही की ते स्वतःही त्याच भावनेचा अनुभव घेत असतील. तसेच, केवळ फोटो दाखवून काढलेल्या निष्कर्षांना संपूर्ण सत्य मानणे योग्य ठरणार नाही. कारण हा शोध पाळीव कुत्र्यांवर करण्यात आला आहे, तर भटक्या किंवा रस्त्यावरील कुत्र्यांचे वातावरण वेगळे असते. त्यामुळे त्यांचा मानवी भावनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. आता याच्या पुढे जाऊन वैज्ञानिक हे शोधून काढणार आहेत की, माणूस आणि कुत्रे एकाच इमोशनल सिग्नलवर प्रक्रिया कशी करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news