

वॉशिंग्टन ः पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी जा आणि बारकाईने पाहा, तुम्हाला कीटक आढळतीलच! तुमच्या घराच्या मागील परसातही पाहा, तेथे मुंग्या, भुंगे, डास आणि बरेच काही दिसेल. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या आणि वनस्पतींच्या तुलनेत कीटकांच्या प्रजाती अधिक आहेत. हा रोचक तथ्य शास्त्रज्ञांना शतकानुशतके भुरळ घालत आहे.
जीवशास्त्रज्ञ म्हणून आम्ही सजीवांची वर्गवारी करतो. कीटक हे आथर्—ोपोडा या संघात मोडतात. या प्राण्यांना कठीण बाह्य सांगाडा आणि सांधेदार पाय असतात. सर्व कीटक आथर्—ोपोडा गटात मोडतात, पण सर्व आथर्—ोपोडा कीटक नसतात. उदा. कोळी, खेकडे आणि बहुपाद जीव हे आथर्—ोपोडा गटात येतात, पण ते कीटक नाहीत. कीटक हे आथर्—ोपोडाच्या ‘इन्सेक्टा‘ या वर्गात मोडतात. यांची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे सहा पाय, दोन स्पर्शेंद्रिये आणि तीन शरीर विभाग - डोके, उदर आणि वक्ष. बहुतेक कीटकांना पंख असतात; मात्र काही उदा. पिस्सू (fleas) यांना पंख नसतात. सर्व कीटकांकडे संयुग नेत्र (compound eyes) असतात, ज्यामुळे त्यांचे पाहण्याचे तंत्र वेगळे असते. माणसांच्या डोळ्यांप्रमाणे एका डोळ्याला एकच लेन्स नसून, त्यांच्याकडे अनेक असतात. उदाहरणार्थ, माशीच्या डोळ्यांत 5,000 लेन्स, तर ड्रॅगनफ्लायमध्ये 30,000 लेन्स असतात. अशा डोळ्यांमुळे चित्र स्पष्ट दिसत नसले, तरी हालचाल पटकन ओळखता येते. सर्व कीटकांचा उगम सुमारे 480 दशलक्ष वर्षांपूर्वी झाला. हे आमच्या पृष्ठवंशीय पूर्वजांच्या स्थलांतराच्या 100 दशलक्ष वर्षे आधीचे आहे. जीवशास्त्रज्ञ जीवांची वर्गवारी करण्यासाठी प्रजाती (species) ही सर्वात महत्त्वाची संकल्पना वापरतात. आपण जेव्हा मुंगी, माशी किंवा फुलपाखरू यासारखे शब्द वापरतो, तेव्हा आपण विशिष्ट प्रजातीबद्दल नाही, तर हजारो प्रजाती असलेल्या गटाबद्दल बोलत असतो. उदा. फुलपाखरांच्या 18,000 प्रजाती आहेत. मोनार्क, झेब—ा स्वालोटेल, कॅबेग व्हाईट इत्यादी. प्रत्येक प्रजातीची एक विशिष्ट वैज्ञानिक नावे असते. उदा. ब—ाऊन-बेल्टेड भुंग्याचे नाव आहे. "Bombus griseocollis" यामुळे शास्त्रज्ञांना अचूक प्रजाती ओळखणे सोपे जाते.