New Butterfly Species Discovered | नवीन फुलपाखराचा शोध!

New Butterfly Species Discovered |
New Butterfly Species Discovered | नवीन फुलपाखराचा शोध!
Published on
Updated on

इटानगर (अरुणाचल प्रदेश) : भारताच्या ईशान्येकडील प्रदेशात, विशेषतः अरुणाचल प्रदेशात निसर्गाचा अनमोल ठेवा दडलेला आहे. या ठिकाणी युथेलिया या वंशातील एका फुलपाखराच्या नवीन प्रजातीची नोंद झाली आहे. प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या सन्मानार्थ या प्रजातीला झुबीनगार्गी असे नाव देण्यात आले आहे.

युथेलिया या वंशातील फुलपाखरे साधारणपणे तपकिरी रंगाची असतात आणि त्यांच्या पंखांवर फिकट रंगाचे ठिपके असतात. हे फुलपाखरू कमी उंचीवरील वनस्पतींवर विश्रांती घेताना आढळते. याचा उडण्याचा वेग कमी असून, ते कमी अंतराचा प्रवास करते. प्रामुख्याने झाडांचा रस ही फुलपाखरे पितात. तसेच, ओलाव्याच्या ठिकाणाहून किंवा ओढ्यांच्या कडेला असलेल्या जमिनीतून ही फुलपाखरे खनिजे शोषताना दिसतात. युथेलिया फुलपाखरांची ही प्रजाती 600 ते 750 मीटर उंचीवरील निम-सदाहरित जंगलांमध्ये आढळते.

जंगलातील थंड आणि सावली असलेल्या भागात राहणे हे फुलपाखरू पसंत करते. दुपारी ही प्रजाती सर्वाधिक सक्रिय असते. या फुलपाखरांना पर्यावरणीय महत्त्व आहे. पर्यावरणाचे बायो-इंडिकेटर म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. एखाद्या भागातील फुलपाखरांची संख्या आणि विविधता त्या ठिकाणच्या पर्यावरणाचे आरोग्य दर्शवते. युथेलिया झुबीनगार्गीचा शोध हा ईशान्य भारतातील नाजूक परिसंस्थेच्या जतनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news