2500 वर्षांपूर्वीच्या रंगीत चित्रे असलेल्या मकबर्‍याचा शोध

discovery of 2500 year old tomb with colorful paintings
2500 वर्षांपूर्वीच्या रंगीत चित्रे असलेल्या मकबर्‍याचा शोध.Pudhari File Photo
Published on
Updated on

रोम : इटलीमध्ये एका प्राचीन स्थळी करण्यात आलेल्या उत्खननात संशोधकांना 2500 वर्षांपूर्वीच्या एका मकबर्‍याचा शोध लागला आहे. या मकबर्‍याच्या भिंती रंगीत चित्रांनी सजवलेल्या आहेत. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकात इटलीमध्ये वसलेल्या टु्रस्कान्स या समुदायातील लोकांचा हा मकबरा आहे. या लोकांना कालांतराने रोमन लोकांनी जिंकले होते.

इटलीच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या संशोधनाची माहिती दिली आहे. त्यानुसार या मकबर्‍याच्या भिंती अतिशय सुंदर व रंगीत चित्रांनी सजवलेल्या आहेत. त्यामध्ये अनेक द़ृश्ये चित्रीत केली आहेत. एका बासरीवादकासमोर नृत्य करणार्‍या स्त्री-पुरुषांचे चित्रही त्यामध्ये आहे. अन्य एक चित्र दोन तरुण पुरुषांसह असलेल्या एका स्त्रीचे आहे. हा मकबरा याच स्त्रीचा असावा, असे संशोधकांना वाटते. यामधील एक चित्र धातूच्या वस्तू बनवणार्‍या कारखान्याचेही आहे. त्यावरून असे दिसते की मृत महिलेचे कुटुंब धातूकाम करणारे होते. या कुटुंबाच्या उत्पन्नाचा स्रोतही यामधून समजतो असे संशोधकांचे म्हणणे आहे. नॅशनल आर्कियोलॉजिकल म्युझियम ऑफ फ्लोरेन्समधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. तेथील संचालक डॅनिएल फेडरिको मारास यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यापैकी नृत्य-वादनाचे चित्र संबंधित महिलेच्या अंत्यसंस्काराचे द़ृश्य साकारणारे असावे, असे त्यांना वाटते. या मकबर्‍याची कालौघात लूट झाली असावी, असे सकृतदर्शनी आढळले आहे. हा मकबरा एका ढासळलेल्या थडग्याच्या खाली आहे. टार्किनिया नेक्रोपोलिस येथे हा मकबरा आढळला. हे ठिकाण रोमपासून वायव्येला 72 किलोमीटरवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news