बिबट्या कोरलेल्या 2400 वर्षांपूर्वीच्या सोन्याच्या अंगठीचा शोध

कझाकिस्तानात पाचव्या शतकातील सोन्याचे दागिने व शस्त्रे सापडली
discovery of 2400 year old gold ring with leopard engraving
बिबट्या कोरलेल्या 2400 वर्षांपूर्वीच्या सोन्याच्या अंगठीचा शोध.Pudhari File Photo
Published on
Updated on

मॉस्को : कझाकिस्तानात संशोधकांना इसवी सनापूर्वीच्या पाचव्या शतकातील काही सोन्याचे दागिने व शस्त्रे सापडली आहेत. त्यामध्ये बिबट्याचा आकार कोरलेल्या एका सोन्याच्या अंगठीचा समावेश आहे. दफनभूमीच्या तीन टेकड्यांमधील उत्खननानंतर 2400 वर्षांपूर्वीच्या या दागिन्यांचा शोध लागला.

कॅस्पियन समुद्राच्या उत्तरेस असलेल्या अटीरावू परिसरात हे संशोधन झाले. हा भाग एकेकाळी सर्माटियन लोकांच्या वसाहतीचा मुख्य भाग होता. पुरातत्त्व संशोधक मॅराट कॅसेनोव्ह यांनी याबाबतचे संशोधन केले. त्यांनी सांगितले की, यापूर्वी असे अनुमान होते की अटीरावू हे ठिकाण या सर्माटियन वसाहतीच्या सीमेवर असावे. मात्र, ते या वसाहतीमधील मध्यवर्ती ठिकाण होते, असे आता आढळले आहे. येथील दफन टेकड्यांमधील उत्खननातून आतापर्यंत एक हजारपेक्षाही अधिक कलाकृती सापडल्या आहेत. त्यामध्ये शंभरपेक्षाही अधिक सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. हे दागिने वेगवेगळ्या प्राण्यांचे चित्रण करणार्‍या खास सर्माटियन शैलीतील आहेत. त्या काळात तिथे बिबटे, अस्वले, वाघ असे प्राणी मोठ्या संख्येने होते. या प्राण्यांचे रूपडे त्यांच्या दागिन्यांवर कोरलेले आढळते. उत्खननात काही मानवी अवशेष, सिरॅमिकची भांडी आणि दोन लाकडी वाडगीही आढळली. खरे तर लाकडी वस्तू कालौघात नष्ट होऊन जातात, पण अद्यापही ही वाडगी सुरक्षित राहिली हे एक दुर्मीळ उदाहरण आहे. उत्खननात धातूंचा विशेषतः सोन्याचा कस लावणार्‍या दोन काळ्या ‘टचस्टोन्स’चाही शोध लागला, ज्यांना सोन्याची मूठ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news