Satellite to phone network | थेट अंतराळातून तुमच्या फोनमध्ये नेटवर्क!

2030 पर्यंत 46 टक्के स्मार्ट फोन्समध्ये असेल ‘सॅटेलाईट कॉलिंग’
Satellite to phone network |
Satellite to phone network | थेट अंतराळातून तुमच्या फोनमध्ये नेटवर्क!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : स्मार्ट फोनचे जग आता एका नवीन आणि रोमांचक युगात प्रवेश करत आहे. खराब नेटवर्क किंवा ‌‘नो सिग्नल‌’ यांसारख्या समस्या आता लवकरच इतिहासजमा होणार आहेत. प्रसिद्ध संशोधन संस्था ‌‘काउंटरपॉइंट रिसर्च‌’च्या ताज्या अहवालानुसार, सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी असलेले स्मार्टफोन्स आता वेगाने बाजारपेठ काबीज करत आहेत. अंदाजानुसार, साल २०३० पर्यंत जगभरात विकल्या जाणाऱ्या एकूण स्मार्टफोन्सपैकी ४६ टक्के (साधारण निम्मे) फोन ‌‘डायरेक्ट-टू-सॅटेलाइट‌’ (NTN- capable) कनेक्टिव्हिटीने सज्ज असतील. सुरुवातीला ही सुविधा कंपन्यांच्या स्वतःच्या खास नेटवर्कवर चालेल, कारण एक समान जागतिक मानक (उदा. ३ GPP NTN) पूर्णपणे विकसित होण्यासाठी अद्याप काही अवधी लागणार आहे.

या तंत्रज्ञानाची सुरुवात करण्याचे श्रेय ‌‘ॲपल‌’ला जाते. २०२२ मध्ये आयफोन १४ सोबत ‌‘सॅटेलाइट SOS’ फीचर सादर करून ॲपलने जगाला चकित केले होते. यासाठी त्यांनी ‌‘ग्लोबलस्टार‌’ या सॅटेलाईट कंपनीशी हातमिळवणी केली होती. विशेष म्हणजे, नुकतेच दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने ग्लोबलस्टारला खरेदी केले आहे, ज्यामुळे ॲमेझॉनसाठी कनेक्टिव्हिटी क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे. ॲपलच्या पावलावर पाऊल ठेवत २०२३ मध्ये हुवेईने ही सुविधा दिली. आज सॅमसंग, गुगल, शाओमी, ओप्पो आणि विवो यांसारखे १० हून अधिक बँडस्‌ निवडक मॉडेल्समध्ये ही सुविधा देत आहेत. काउंटरपॉइंटचे प्रिन्सिपल ॲनालिस्ट सौमेन मंडल यांच्या मते, ॲपल : सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी फोन विक्रीत आजही नंबर वन आहे. सॅमसंग : अँड्रॉइडच्या जगात सॅमसंग सर्वात आघाडीवर आहे.

ॲपल, हुवेई आणि गुगल स्वतःचे खासगी सॅटेलाईट नेटवर्क वापरण्याची रणनीती आखत आहेत. तर दुसरीकडे, सॅमसंग आणि इतर चिनी बँड्‌‍स ‌‘३ GPP NTN' नावाच्या कॉमन स्टँडर्डचा अवलंब करत आहेत, जेणेकरून भविष्यात ही सेवा सर्वांसाठी सहज उपलब्ध होऊ शकेल. सध्या सॅटेलाइट कॉलिंगची सुविधा केवळ प्रीमियम (महागड्या) स्मार्टफोन्समध्येच उपलब्ध आहे. याची मुख्य कारणे अशी आहेत : १. मर्यादित वापर : सध्या हे तंत्रज्ञान फक्त आपत्कालीन मेसेज ( SOS) पाठवण्यापुरते मर्यादित आहे. २. किलर यूज केसचा अभाव : जोपर्यंत यातून सामान्य कॉलिंग किंवा इंटरनेट सुरू होत नाही, तोपर्यंत सामान्य ग्राहक याला प्राधान्य देणार नाहीत. ३. तंत्रज्ञान विकास : तज्ज्ञांच्या मते, ‘३ GPP रिलीज १८‌’ मुळे हे फीचर प्रीमियम फोन्समध्ये अधिक वाढेल, परंतु मध्यम बजेटच्या फोन्समध्ये याची एन्ट्री ‌‘३ GPP रिलीज १९‌’ आल्यानंतरच शक्य होईल. सध्या सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत अमेरिका सर्वात पुढे आहे. तेथील टी-मोबाइलने स्पेस-एक्स सोबत, तर एटी अँड टी ( AT&T) ने एएसटी मोबाइलशी मोठे करार केले आहेत. मात्र, युरोप आणि चीनमधील टेलिकॉम कंपन्या सध्या तरी हे तंत्रज्ञान आणण्यासाठी घाई करताना दिसत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news