’त्या’ डायनासोरकालीन ’मेगारिपल्स’ अनुमानापेक्षा अधिक मोठ्या

Megaripples : नव्या संशोधनातून माहिती समोर
Megaripples
’त्या’ डायनासोरकालीन ’मेगारिपल्स’ अनुमानापेक्षा अधिक मोठ्या
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः डायनासोरांच्या विनाशास कारणीभूत ठरलेल्या लघुग्रहाच्या महाप्रलयंकारी धडकेनंतर समुद्रतळात निर्माण झालेल्या ‘मेगारिपल्स’ अपेक्षेपेक्षा खूपच मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या आहेत, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन 66 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या क्रेटेशस युगाच्या शेवटी लघुग्रहाच्या धडकेने निर्माण झालेल्या प्रचंड त्सुनामीच्या प्रभावांवर नव्याने प्रकाश टाकते. या धडकेमुळे निर्माण झालेले विवर आजही मेक्सिकोच्या चिक्सुलब येथे निम्मे समुद्रात व निम्मे जमिनीवर पाहायला मिळते.

‘मरीन जिओलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, संशोधकांनी पेट्रोलियम उद्योगाच्या थ—ीडी सिस्मिक डेटाचे विश्लेषण केले. यात असे आढळले की त्सुनामीमुळे तयार झालेल्या या मेगारिपल्स पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप मोठ्या क्षेत्रामध्ये पसरलेल्या आहेत. 2021 च्या एका अभ्यासात, लुईझियाना विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ गेरी किन्सलँड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मध्य लुईझियानाच्या किनार्‍याजवळ 200 चौरस किलोमीटर क्षेत्रात या मेगारिपल्स असल्याचे प्रथम ओळखले होते. एकेकाळी समुद्राच्या पाण्यात बुडालेला हा भाग आता तुलनेने उथळ असून त्यानंतर खोल समुद्रात उतरणारा आहे. 2021 च्या अभ्यासानुसार, त्सुनामीच्या प्रचंड लाटांनी गाळयुक्त समुद्रतळावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करून या मेगारिपल्स तयार केल्या. या लाटांनी तयार केलेल्या या रचनांची सरासरी उंची 52 फूट (16 मीटर) आणि एका शिखरापासून दुसर्‍या शिखरापर्यंतची लांबी 1,970 फूट (600 मीटर) असल्याचे आढळले. या आधीच्या अभ्यासावर आधारित संशोधकांनी आता 2,400 चौरस किलोमीटर क्षेत्रातील थ—ीडी सिस्मिक डेटा तपासला. यामुळे मेगारिपल्स संपूर्ण अभ्यास क्षेत्रात पसरलेल्या असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे त्सुनामीचा प्रभाव किती व्यापक आणि शक्तिशाली होता हे सिद्ध होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news