Yellow gold and white gold: पिवळे सोने आणि पांढरे सोने यामध्ये फरक काय?

व्हाईट गोल्ड आणि यलो गोल्ड दोन्हीमध्ये ‌‘असली‌’ सोनेच असते, मात्र त्यांचा रंग आणि बनावट वेगळी असते
Yellow gold and white gold:
Yellow gold and white gold:Pudhari
Published on
Updated on

मुंबई : सोन्याचे दागिने खरेदी करताना आजकाल ग्राहकांसमोर एक मोठा प्रश्न असतो... पारंपरिक ‌‘यलो गोल्ड‌’ (पिवळे सोने) घ्यावे की आधुनिक ‌‘व्हाईट गोल्ड‌’ (पांढरे सोने)? बदलत्या फॅशन ट्रेंडमुळे आणि गुंतवणुकीच्या नव्या दृष्टिकोनामुळे हा निर्णय घेणे कठीण झाले आहे. आजची तरुण पिढी मॉडर्न लूकसाठी व्हाईट गोल्डला पसंती देत आहे, तर अनेकजण आजही परंपरा आणि विश्वासासाठी पिवळ्या सोन्यालाच पसंती देतात. व्हाईट गोल्ड आणि यलो गोल्ड दोन्हीमध्ये ‌‘असली‌’ सोनेच असते, मात्र त्यांचा रंग आणि बनावट वेगळी असते.

यलो गोल्ड (पिवळे सोने) : हजारो वर्षांपासून भारतात पिवळ्या सोन्याला मोठी मागणी आहे. हे सोने शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पिवळे सोने तयार करण्यासाठी शुद्ध सोन्यात तांबे आणि चांदी या धातूंचे मिश्रण केले जाते. लग्नसराई आणि पारंपरिक सणांवेळी आजही पिवळ्या सोन्याच्या दागिन्यांची सर्वाधिक विक्री होते.

व्हाईट गोल्ड (पांढरे सोने) : हे आधुनिक काळातील तरुण पिढीची पहिली पसंती बनले आहे. हे सोने तयार करण्यासाठी सोन्यात निकेल किंवा पॅलेडियम सारखे धातू मिसळले जातात. यावर ‌‘रोडिअम‌’ची कोटिंग केली जाते, ज्यामुळे याला चांदीसारखा चमकदार पांढरा रंग येतो. विशेषतः, हिऱ्याच्या दागिन्यांसाठी व्हाईट गोल्डचा सर्वाधिक वापर केला जातो. पारंपरिक आणि शाही लूकसाठी यलो गोल्ड, तर वेस्टर्न आणि मॉडर्न लूकसाठी सहसा व्हाईट गोल्डचा वापर केला जातो. जर तुम्ही फॅशन आणि सध्याच्या ट्रेंडला महत्त्व देत असाल, तर वेस्टर्न कपड्यांवर व्हाईट गोल्ड हा एक उत्तम पर्याय आहे.

मात्र, जर तुम्ही दागिन्यांकडे एक ‌‘गुंतवणूक‌’ म्हणून पाहत असाल, तर पिवळे सोने अधिक फायदेशीर ठरते. व्हाईट गोल्डची चमक टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी पॉलिश आणि कोटिंगचा खर्च करावा लागतो, जो पिवळ्या सोन्याच्या बाबतीत कमी असतो. पिवळे सोने हे गुंतवणुकीसाठी अत्यंत सुरक्षित मानले जाते. व्हाईट गोल्डचा गुंतवणुकीपेक्षा फॅशनसाठी अधिक वापर होतो. पिवळ्या सोन्याची पुनर्विक्री किंमत चांगली मिळते. मेकिंग चार्जेस आणि कोटिंगमुळे व्हाईट गोल्डची किंमत काहीशी कमी होऊ शकते.

पिवळ्या सोन्याची देखभाल करणे सोपे आहे. ठराविक काळानंतर व्हाईट गोल्डवर रोडिअम कोटिंग पुन्हा करावी लागते. त्यामुळे जर तुम्ही फॅशन आणि सध्याच्या ट्रेंडला महत्त्व देत असाल, तर वेस्टर्न कपड्यांवर व्हाईट गोल्ड हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र, जर तुम्ही दागिन्यांकडे एक ‌‘गुंतवणूक‌’ म्हणून पाहत असाल, तर पिवळे सोने अधिक फायदेशीर ठरते, असे तज्ज्ञ सांगतात. व्हाईट गोल्डची चमक टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी पॉलिश आणि कोटिंगचा खर्च करावा लागतो, जो पिवळ्या सोन्याच्या बाबतीत कमी असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news