काळं मीठ, सैंधव मीठ, रॉक सॉल्ट फरक काय?

बहुतेक घरांमध्ये आपण सामान्य पांढरं मीठ वापरतो
difference-between-black-salt-sendha-salt-and-rock-salt
काळं मीठ, सैंधव मीठ, रॉक सॉल्ट फरक काय?Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : बहुतेक घरांमध्ये आपण सामान्य पांढरं मीठ वापरतो, पण उपवासाच्या वेळी आपण ‘सैंधव मीठ’ वापरतो. तसेच काही घरांमध्ये ‘काळं मीठ’ ही वापरले जाते. याशिवाय अलीकडे ‘रॉक सॉल्ट’ किंवा ‘हिमालयन पिंक सॉल्ट’ची चर्चा वाढली आहे; पण हे सगळे मीठ सारखेच आहेत की वेगवेगळे, याबाबत अनेक मतप्रवाह आहेत.

बहुतेक भारतीय घरांमध्ये मिठाशिवाय जेवण अपूर्णच वाटतं. चवीनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मिठांचा वापर करतो. सामान्य पांढरं मीठ, काळं मीठ, सैंधव मीठ आणि आता पिंक सॉल्ट; पण प्रत्येक मिठाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या मिठांमध्ये वेगवेगळे मिनरल्स असतात. प्रत्येक प्रकारच्या मिठामध्ये विशिष्ट प्रकारची पोषक द्रव्यं (मिनरल्स) असतात. त्यामुळे त्यांचा स्वाद आणि शरीरावर होणारा परिणामदेखील वेगळा असतो.

काळं मीठ : काळ्या मिठामध्ये सल्फेट, आयर्न (लोखंड), मॅग्नेशियम यासारखे घटक असतात. त्यामुळे त्याचा चव थोडा आंबटसर (टँगी) आणि उग्र असतो. हा पचनासाठी उपयुक्त मानला जातो.

रॉक सॉल्ट/सैंधव मीठ : अनेकांना हे माहिती नसते, पण सैंधव मीठम्हणजेच रॉक सॉल्ट होय. उपवासात वापरले जाणारे हे मीठ नैसर्गिक स्वरूपात खाणीतून मिळतं. यात सोडियम क्लोराइड भरपूर असतो आणि इतर ट्रेस मिनरल्सही असतात. भारतात हे प्रामुख्याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आयात केले जाते.

पिंक सॉल्ट : हिमालयातून मिळणार्‍या पिंक सॉल्टमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे घटक असतात. त्यामुळे त्याची चव थोडी सौम्य आणि किंचित गोडसर लागते. प्रत्येक प्रकारचं मीठ वेगवेगळ्या आरोग्यदायी गुणधर्मांसह येतं. त्यामुळे ते केवळ चवीनुसार नव्हे, तर शरीराच्या गरजेनुसार वापरणं अधिक योग्य ठरतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news