12000 years old games | 12,000 वर्षांपूर्वीच ‘फासे’, ‘नशिबाच्या खेळांचा’ शोध

12000 years old games |
12000 years old games | 12,000 वर्षांपूर्वीच ‘फासे’, ‘नशिबाच्या खेळांचा’ शोध
Published on
Updated on

वॉशिंग्टन : नशिबावर आधारित खेळ किंवा जुगार हा आधुनिक काळातील शोध नसून, तो हजारो वर्षांपूर्वीचा आहे. एका नवीन संशोधनानुसार, मूळ अमेरिकन रहिवाशांनी तब्बल 12,000 वर्षांपूर्वीच फासे (Dice) आणि नशिबाच्या खेळांचा (Games of Chance) शोध लावला होता, असे समोर आले आहे.

अमेरिकेच्या पश्चिम भागातील विविध पुरातत्त्व स्थळांवर झालेल्या उत्खननात संशोधकांना हाडांपासून बनवलेले छोटे तुकडे आणि चिन्हांकित केलेल्या वस्तू सापडल्या आहेत. या वस्तूंचा वापर फासे म्हणून केला जात असे. संशोधकांच्या मते, हे पुरावे ‘पॅलेओ-इंडियन’ काळातील आहेत, ज्यावरून असे सिद्ध होते की, उत्तर अमेरिकेतील सर्वात जुन्या संस्कृतींमध्येही खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण होते.

संशोधकांचे म्हणणे आहे की, हे खेळ केवळ मनोरंजनासाठी खेळले जात नव्हते. विविध जमातींमधील लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि संबंध द़ृढ करण्यासाठी या खेळांचा वापर होत असे. अनेकदा साधनसामग्रीची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा विवादांचे निराकरण करण्यासाठी नशिबाच्या खेळांची मदत घेतली जात असे. काही प्रसंगी हे खेळ आध्यात्मिक विधींचा भागदेखील असायचे.

आतापर्यंत असे मानले जात होते की, सुरुवातीचा मानव केवळ शिकार आणि जगण्यासाठी संघर्ष करण्यात व्यस्त होता. मात्र, 12,000 वर्षांपूर्वीचे हे खेळांचे पुरावे हे दर्शवतात की, मूळ अमेरिकन रहिवाशांकडे एक विकसित सामाजिक व्यवस्था आणि मोकळा वेळ घालवण्यासाठी गुंतागुंतीच्या पद्धती उपलब्ध होत्या. या शोधामुळे मूळ अमेरिकन लोकांच्या प्राचीन इतिहासाकडे पाहण्याचा जगाचा द़ृष्टिकोन बदलणार आहे. मानवी उत्क्रांतीमध्ये ‘खेळ’ आणि ‘जोखीम घेण्याची वृत्ती’ किती खोलवर रुजलेली आहे, हेच यातून स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news