Deer Aggressive Behavior | पराभूत प्रतिस्पर्ध्याचे मुंडके घेऊन फिरणारे हरीण!

’वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ स्पर्धेतील चित्तवेधक छायाचित्र
Deer Aggressive Behavior
Deer Aggressive Behavior | पराभूत प्रतिस्पर्ध्याचे मुंडके घेऊन फिरणारे हरीण!
Published on
Updated on

लंडन : निसर्गाचे रौद्र रूप आणि त्याचे विलोभनीय सौंदर्य टिपणार्‍या ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील ‘नवीन पीपल्स चॉईस अ‍ॅवॉर्ड 2026’ साठीची नामांकने जाहीर झाली आहेत. लंडनच्या नॅशनल हिस्ट्री म्युझियमद्वारे आयोजित या स्पर्धेत यंदा जगाला थक्क करणारे फोटो पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील काही छायाचित्रे अंगावर काटा आणणारी आहेत, तर काही निसर्गाच्या वास्तववादाचे दर्शन घडवतात. आता या छायाचित्रांमधून विजेते निवडण्यासाठी जगभरातील कोणालाही ऑनलाईन मतदान करता येणार आहे. स्पर्धेतील काही खास छायाचित्रांमध्ये एका हरणाचा विजयी उन्माद दर्शवणारे एक छायाचित्र चित्तवेधक आहे. या छायाचित्रात एक हरीण आपल्या पराभूत आणि मृत प्रतिस्पर्ध्याचे सडलेले मुंडके आपल्या शिंगांमध्ये अडकवून फिरताना दिसत आहे. निसर्गातील अस्तित्वाच्या लढाईचे हे एक भयंकर पण सत्य रूप आहे.

या स्पर्धेतील अन्य छायाचित्रांमध्ये एका खेळकर लिंक्सचे छायाचित्र समाविष्ट आहे. या ‘लिंक्स’ (रानमांजरसद़ृश प्राणी) नावाच्या प्राण्याने आपली शिकार करण्यापूर्वी अन्नाशी खेळतानाचा क्षण यात टिपला आहे. दुसरे छायाचित्र दुर्मीळ पट्टे असलेल्या वाघाचे आहे. या वाघाच्या अंगावर अत्यंत रुंद आणि गडद काळ्या रंगाचे पट्टे आहेत. जनुकीय बदलामुळे निर्माण झालेले हे दुर्मीळ द़ृश्य कॅमेर्‍यात कैद झाले आहे. शेकडो ‘स्पिनर डॉल्फिन्स’चा समूह एकत्र येऊन माशांच्या थव्याला समुद्राच्या पृष्ठभागावर रेटतानाचे विलोभनीय द़ृश्य एका छायाचित्रात टिपण्यात आले आहे.

स्पर्धेमध्ये ध्रुवीय अस्वलांची दोन भावुक करणारी छायाचित्रेही आहेत. कॅनडातील उन्हाळ्यात उघड्या जमिनीवर विश्रांती घेणारी अस्वलाची मादी आणि तिची तीन पिल्ले यामध्ये टिपली आहेत. या स्पर्धेसाठी मतदानाची खिडकी आता खुली झाली असून, 18 मार्चपर्यंत जगभरातून ऑनलाईन मतदान करता येईल. विजेत्या छायाचित्राची घोषणा 25 मार्च रोजी केली जाईल. विजयी फोटो आणि गेल्या वर्षातील उत्कृष्ट 100 छायाचित्रे लंडनच्या नॅशनल हिस्ट्री म्युझियममध्ये जुलै 2026 पर्यंत प्रदर्शनासाठी ठेवली जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news