Death Valley: डेथ व्हॅलीमधील झुडपाचे उष्मा सहन करण्याचे गुपित उघड!

उच्च तापमानात पिकांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे संशोधन
Death Valley: डेथ व्हॅलीमधील झुडपाचे उष्मा सहन करण्याचे गुपित उघड!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक असलेल्या ठिकाणी, एक अनोखी वाळवंटी वनस्पती कशी तग धरू शकते, याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. तापमान वाढल्यावर ही वनस्पती आपल्या अंतर्गत रचनांमध्ये बदल करते, असे दिसून आले आहे. कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये वारंवार अत्यंत टोकाची परिस्थिती अनुभवायला मिळते. उन्हाळ्यातील तापमान सावलीतही अनेकदा 49 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढते. इतक्या उष्णतेमुळे बहुतेक वनस्पती कोमेजून जातात; परंतु ‌‘टाइडस्ट्रोमिया ऑब्लोंगीफोलिया‌’ (Tidestromia oblongifolia) ही वनस्पती मात्र या उष्णतेतही जोमाने वाढते.

आता संशोधकांना असे आढळून आले आहे की, ही राखाडी-हिरवी फुले येणारी झुडपे अति-उष्ण परिस्थितीत भरभराट होण्यासाठी लहान पाने वाढवतात आणि त्यांच्या अंतर्गत रचनांमध्ये फेरबदल करतात. त्यांना हे देखील आढळले आहे की, या झुडपामध्ये सर्वात जास्त प्रकाशसंश्लेषी उष्णता सहनशीलता आहे, म्हणजेच, ज्ञात असलेल्या कोणत्याही वनस्पतीपेक्षा उच्च तापमानावर प्रकाशसंश्लेषण करण्याची क्षमता यात आहे. हे संशोधन 17 नोव्हेंबर रोजी ‌‘करंट बायोलॉजी‌’ जर्नलमध्ये प्रकाशित झाले. जागतिक तापमानवाढीमुळे तापमान वाढत आहे आणि उष्णतेच्या लाटांची वारंवारता वाढत आहे. या उष्णतेमुळे गहू आणि मका यांसारख्या मुख्य अन्नधान्यांचे उत्पादन आधीच कमी होत आहे. तापमान वाढत असताना अन्नसुरक्षेवर याचा काय परिणाम होईल, याबद्दल शास्त्रज्ञ आणि अधिकारी चिंतित आहेत.

T. oblongifolia सारख्या उष्णता-प्रेमी वनस्पतींमध्ये, इतर पिकांना उष्णतेत तग धरण्यास मदत करण्यासाठी आणि लोकांच्या ताटात अन्न ठेवण्यासाठी रहस्ये दडलेली असू शकतात. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्लांट रेझिलिअन्स इन्स्टिट्यूटचे संचालक आणि वनस्पती जीवशास्त्रज्ञ, तसेच अभ्यासाचे सह-लेखक सेउंग ऱ्ही यांनी सांगितले की, ‌‘त्यांचे अनुकूलन समजून घेतल्यास, वाढत्या वारंवारतेने आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या उच्च तापमानाखाली वाढ सुधारण्यासाठी संशोधकांना पिके, वातावरण आणि व्यवस्थापन धोरणे तयार करण्यात मदत होऊ शकते. T. oblongifolia मध्ये काहीतरी खास आहे, हे शास्त्रज्ञांना अनेक दशकांपासून माहीत आहे. उच्च तापमानात, बहुतेक वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषणाचा दर कमी होतो; परंतु 1972 मध्ये, संशोधकांनी दाखवून दिले होते की T. oblongifolia चे प्रकाशसंश्लेषण 117 ऋ (47 उ) तापमानाला सर्वोच्च पातळीवर (झशरज्ञशव) पोहोचते. ही वनस्पती इतर वनस्पती कोमेजून जात असतानाही प्रकाशसंश्लेषण आणि भरभराट कशी करू शकते हे शोधण्यासाठी, नवीन अभ्यासामागील संशोधकांनी डेथ व्हॅलीमधून बिया गोळा केल्या आणि वाढीच्या कंटेनरमध्ये त्या वनस्पती वाढवल्या.

वनस्पती आठ आठवड्यांच्या झाल्यावर, शास्त्रज्ञांनी त्यांना एक महिन्यासाठी डेथ व्हॅलीच्या परिस्थितीत ठेवले. त्यानंतर त्यांनी वनस्पतींच्या प्रतिसादांचे निरीक्षण केले, जसे की त्यांनी किती कार्बन डायऑक्साईड शोषला. केवळ दोन दिवसांच्या आत, T. oblongifolia ने तिच्या प्रकाशसंश्लेषणाचा दर वाढवला. दहा दिवसांनंतर, तिने कमी तापमानावर तयार केलेल्या पानांपेक्षा लहान असलेल्या पानांच्या विपुलतेमुळे तिचे वस्तुमान तिप्पट केले; पण खरा आश्चर्यकारक बदल वनस्पतीमध्ये आत झाला. शास्त्रज्ञांना आढळले की, तिने अधिक मायटोकाँड्रिया विकसित केले, जे पेशींमधील ऊर्जा केंद्रे किंवा बॅटरी असतात. हे मायटोकाँड्रिया देखील अधिक गतिशील होते आणि प्रकाशसंश्लेषणाच्या ठिकाणांच्या जवळ जाण्यास सक्षम होते, जे क्लोरोप्लास्टस्‌‍ नावाच्या विशेष अंगकांमध्ये होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news