Mold Infection Fungal | घातक ‘मोल्ड’ बुरशीच्या संसर्गाने होताहेत एक तृतीयांश रुग्णांचे मृत्यू

डेमन केव्हफिशचा शोध
Mold Infection Fungal |
Mold Infection Fungal | घातक ‘मोल्ड’ बुरशीच्या संसर्गाने होताहेत एक तृतीयांश रुग्णांचे मृत्यू
Published on
Updated on

न्यूयॉर्क : अमेरिकेत ‘इन्व्हेसिव्ह मोल्ड’ (घातक बुरशीजन्य संसर्ग) हे मानवी आरोग्यासाठी एक मोठे आणि दुर्लक्षित आव्हान ठरत असल्याचा इशारा अमेरिकेच्या 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन' च्या अभ्यासातून देण्यात आला आहे. अटलांटा परिसरातील चार रुग्णालयांमध्ये २०२० ते २०२४ दरम्यान केलेल्या पाहणीत असे सुमारे ४५० रुग्ण आढळले, त्यापैकी एक तृतीयांश रुग्णांचा उपचारात मृत्यू झाला.

बुरशीचे सूक्ष्म बीजाणू श्वासावाटे किंवा जखमांमधून शरीरात प्रवेश करतात. सामान्य व्यक्तींना याचा फारसा त्रास होत नाही, परंतु वृद्ध, कर्करोगग्रस्त, किंवा कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या (जसे की कोव्हिड-१९ नंतरचे रुग्ण) व्यक्तींसाठी हे संसर्ग प्राणघातक ठरू शकतात. सीडीसीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. जेरेमी गोल्ड यांच्या मते, हवामान बदलांमुळे येणारे महापूर आणि चक्रीवादळांनंतर बुरशीचा प्रसार झपाट्याने वाढतो. तसेच वाढत्या वयोवृद्ध लोकसंख्येमुळे भविष्यात ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करू शकते.

अभ्यासानुसार, दर १०० खाटांमागे ३ ते ५ रुग्ण आढळण्याचा अंदाज आहे. रुग्णालयांना संसर्गाच्या या वाढत्या धोक्याची वेळीच जाणीव व्हावी आणि उपचारांची पूर्वतयारी करता यावी, यासाठी हा अभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news