Data Center Water Consumption | तीन वर्षांत डेटा सेंटर्स अमेरिकन नागरिकांइतके पाणी पितील

Data Center Water Consumption |
Data Center Water Consumption | तीन वर्षांत डेटा सेंटर्स अमेरिकन नागरिकांइतके पाणी पितील
Published on: 
Updated on: 

न्यूयॉर्क : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर आणि त्यासाठी उभारली जाणारी भव्य डेटा सेंटर्स भविष्यात मोठ्या पाणीटंचाईला निमंत्रण देऊ शकतात, असा गंभीर इशारा 'इकोलॅब' (Ecolab) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टोफ बेक यांनी दिला आहे. तंत्रज्ञानात तातडीने सुधारणा न केल्यास २०३० पर्यंत अमेरिकेतील डेटा सेंटर्सना थंड ठेवण्यासाठी लागणारे पाणी हे संपूर्ण देशातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याइतके असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्याची ९५ टक्के डेटा सेंटर्स मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतात. चिप निर्मितीपासून ते त्या थंड ठेवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पाण्याची गरज भासते. जुन्या तंत्रज्ञानानुसार हवा थंड करून चिप्सचे तापमान नियंत्रित केले जात होते, मात्र आधुनिक आणि शक्तिशाली एआय चिप्ससाठी हे पुरेसे नाही. हवा थंड करण्याच्या तुलनेत पाणी ३० पटीने अधिक वेगाने उष्णता शोषून घेते. त्यामुळेच आता थेट चिपवर थंड पाणी सोडणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे.

पाण्याच्या या अतिवापरामुळे अमेरिकेतील टेक्साससारख्या पाणीटंचाई असलेल्या राज्यांत स्थानिक नागरिकांनी डेटा सेंटर्सविरोधात मोठा रोष व्यक्त केला असून, त्याचे पडसाद निवडणुकांमध्येही उमटले आहेत. या समस्येवर उपाय म्हणून इकोलॅबने 'क्लोज्ड लूप' आणि 'कनेक्टेड वॉटर' प्रणाली विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे चिप निर्मिती आणि शीतकरणासाठी वापरलेले अत्यंत शुद्ध पाणी पुन्हा स्वच्छ करून त्याचा पुनर्वापर केला जाईल. यामुळे नवीन डेटा सेंटर्स 'वॉटर न्यूट्रल' होऊन नैसर्गिक स्रोतांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.