धोकादायक ‘2024 वायआर 4’चे जेम्स वेब दुर्बिणीकडून निरीक्षण

 James Webb telescope
धोकादायक ‘2024 वायआर 4’चे जेम्स वेब दुर्बिणीकडून निरीक्षणJUAN GARTNER
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने कुख्यात ‘सिटी-किलर ‘लघुग्रह 2024 वायआर4’ च्या दोन नियोजित निरीक्षणांपैकी पहिले निरीक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. हा लघुग्रह डिसेंबर 2032 मध्ये पृथ्वी आणि चंद्राच्या अत्यंत जवळून जाणार आहे. तो चंद्राला धडकण्याचा धोका आहे.

फेब—ुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या चमूला तातडीच्या दुर्बिणी वेळेचा लाभ देण्यात आला होता. या वेळेत जेम्स वेब दुर्बिणीच्या निरीक्षणात असे आढळले की ‘2024 वायआर4’ हा जमिनीवरील दुर्बिणींच्या निरीक्षणांपेक्षा किंचित मोठा आणि अधिक खडकाळ असू शकतो. सुदैवाने, जेम्स वेबनेही नासाच्या काही आठवड्यांपासून असलेल्या निष्कर्षांची पुष्टी केली. ‘2024 वायआर4’ चा आता पृथ्वीला कोणताही धोका नाही आणि 2032 मध्ये त्याच्या पृथ्वीवर आदळण्याची शक्यता शून्य आहे. मात्र, चंद्राशी थेट टक्कर होण्याची शक्यता अद्यापही कायम आहे. संशोधकांनी त्यांच्या प्राथमिक अहवालात नमूद केले की, ‘22 डिसेंबर 2032 रोजी ’2024 वायआर 4’ च्या पृथ्वीवरील प्रभावाची शक्यता आता पूर्णपणे नाकारली गेली आहे, परंतु त्याचा चंद्राला आदळण्याचा धोका अजूनही शून्य नाही.’ हा अहवाल अद्याप समीक्षणाधीन नाही. या लघुग्रहाचे दुसरे निरीक्षण मे 2025 मध्ये होणार आहे, त्यानंतर तो पुढील काही वर्षांसाठी बाह्य सौरमंडळात अद़ृश्य होईल.

डिसेंबर 2024 मध्ये खगोलशास्त्रज्ञांनी प्रथम ‘2024 वायआर 4’ ला शोधले. सुरुवातीच्या निरीक्षणांमध्ये या अंतराळ खडकाचा व्यास सुमारे 55 मीटर (180 फूट) असल्याचे आढळले, जो पीसाच्या झुकत्या मनोर्‍याएवढा उंच आहे. याची कक्षा वारंवार पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या मार्गाशी ओलांडते, त्यामुळे याच्या पृथ्वीला आदळण्याची शक्यता कायम असते. जर हा लघुग्रह पृथ्वीला धडकला असता, तर तो सुमारे 500 हिरोशिमा बॉम्ब इतक्या शक्तीने संपूर्ण शहर नष्ट करू शकला असता. संशोधकांनी सुरुवातीला ‘2024 वायआर4’ च्या पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 3.1 टक्के असल्याचे सांगितले होते, जे या आकाराच्या लघुग्रहासाठी आतापर्यंत नोंदवलेले सर्वाधिक प्रमाण होते. मात्र, नासाने त्यानंतर या शक्यतेला 0 टक्क्यावर आणले. धोका असतानाच युरोपियन स्पेस एजन्सीने ‘जेम्स वेब’च्या तातडीच्या दुर्बिणी वेळेचा उपयोग या संभाव्य धोकादायक लघुग्रहाच्या आकार आणि कक्षेच्या अभ्यासासाठी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news