Cyborg Hawkmoth | सायबोर्ग हॉकमॉथ : अळीच्या कोशातच बसवले इलेक्ट्रोड्स

Cyborg Hawkmoth |
Cyborg Hawkmoth | सायबोर्ग हॉकमॉथ : अळीच्या कोशातच बसवले इलेक्ट्रोड्स
Published on: 
Updated on: 

न्यूयॉर्कः एखादे सायबोर्ग (यंत्र बसवलेला कीटक) तयार करण्याऐवजी ते 'वाढवता' आले तर? कॉर्नेल विद्यापीठ आणि नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 'टोबॅको हॉर्नवर्म' (Tobacco hornworm - Manduca sexta) या प्रजातीच्या कीटकांवर हाच अनोखा प्रयोग केला. संशोधकांनी या कीटकांच्या कोषावस्थेतच (pupal stage) त्यांच्या शरीरात इलेक्ट्रोड्स बसवले आणि या तंत्रज्ञानासह त्यांना वाढू दिले.

जेव्हा हे कीटक पूर्ण वाढ होऊन प्रौढ हॉकमॉथ (पतंग) म्हणून बाहेर पडले, तेव्हा ते इलेक्ट्रोड्स त्यांच्या उड्डाणाच्या स्नायूंमध्ये आधीच व्यवस्थित जोडले गेले होते. पूर्ण वाढ झालेल्या प्रौढ पतंगात थेट इलेक्ट्रोड्स बसवण्यापेक्षा ही पद्धत अधिक स्थिर आणि विश्वासार्ह ठरली. तसेच या प्रक्रियेमुळे कीटकांना होणारा त्रासही तुलनेने कमी राहिला. त्यानंतर संशोधकांनी या इलेक्ट्रोड्सच्या माध्यमातून उड्डाणाच्या स्नायूंना उत्तेजित करून त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो, याचा अभ्यास केला. या पद्धतीचा आणखी एक फायदा म्हणजे हे पतंग सामान्यपणे उडण्यासही सक्षम राहिले.

२०१४ मध्ये प्रसिद्ध झालेले हे संशोधन 'हायब्रिड इन्सेक्ट मायक्रो-इलेक्ट्रो-मेकॅनिकल सिस्टम्स' (HI-MEMS) या प्रकल्पाचा भाग होते. रिमोटद्वारे नियंत्रित करता येणाऱ्या भुंग्यांवरील संशोधनाप्रमाणेच हाही 'डार्पा' (DARPA) संस्थेच्या निधीतून चालणारा प्रकल्प होता. सजीव कीटक आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचा मेळ घालून सहज हलवता येणारी यंत्रे तयार करता येतात का, हे तपासणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. रोबोटस्‌ सहज पोहोचू शकत नाहीत अशा दुर्गम ठिकाणी भविष्यात या हॉकमॉथच्या माध्यमातून सेन्सर्स (संवेदके) पाठवता येतील, अशी संशोधकांना आशा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.