Viral Ganpati Video | ‘क्यूट बाप्पा’ झाले सोशल मीडियावर व्हायरल!

 Viral Ganpati Video |
Viral Ganpati Video | ‘क्यूट बाप्पा’ झाले सोशल मीडियावर व्हायरल!
Published on
Updated on

अहमदाबादः गणेशोत्सवाच्या काळात देशभरात ठिकठिकाणी बाप्पाच्या अत्यंत सुंदर आणि अनोख्या मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, यंदा गुजरातमधील वापी येथे विराजमान झालेल्या गणपती बाप्पाची सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा रंगली आहे. या मूर्तीतील बाप्पाचे रूप अगदी लहान बालकासारखे निष्पाप आणि मोहक दिसते. त्यांचे मोठे-चमकदार डोळे, गोड हास्य, कुरळे जावळ आणि नटखट चेहरा भक्तांना मनापासून आकर्षित करत आहे. याच कारणामुळे लोक त्यांना प्रेमाने ‘क्यूट बाप्पा’ म्हणून संबोधत आहेत.

वापी येथील या मंडपात पोहोचणारे भाविक काही वेळ स्तब्ध होऊन बाप्पाच्या मूर्तीकडे पाहतच राहत आहेत. विशेषतः, मूर्तीवरील चेहऱ्याचे भाव लोकांना खूप भावत आहेत. सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या व्हिडीओमध्येही भक्तांची नजर बाप्पाच्या या लोभस रूपावरून हटताना दिसत नाही. अनेकजण आपापल्या मोबाईलमध्ये बाप्पाचे फोटो आणि व्हिडीओ टिपत असून, इन्स्टाग्राम व फेसबूकसारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. पाहता पाहता वापीतील या ‘क्यूट बाप्पा’चे फोटो राज्यभर आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या खास गणपती मूर्तीची स्थापना वापी येथील ‘शंभू सेना समिती’च्या वतीने करण्यात आली आहे.

गणेशोत्सवानिमित्त समितीने बाप्पाच्या स्वागतासाठी भव्य आयोजन केले आहे. मंडपात या गोंडस मूर्तीसोबतच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. येथील भव्य महाआरतीला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बाप्पाच्या चेहऱ्यावरील बालसुलभ निष्पापपणा पाहून सोशल मीडिया यूजर्सने त्यांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारण्यास सुरुवात केली आहे. कोणी त्यांना ‘क्यूट बाप्पा’ म्हणत आहे, तर कोणी ‘Vapi’s Cutest Bappa’ या नावाने व्हिडीओ शेअर करत आहे. काही नेटिझन्स तर प्रेमाने त्यांना ‘चोको पाय बाप्पा’ असेही संबोधत आहेत. नाव काहीही असले, तरीही सध्या सर्वत्र बाप्पाचे गोड हास्य आणि त्यांच्या चमकदार डोळ्यांचीच चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news