सर्वच रंगांचे बेदाणे पोषक तत्त्वांनी संपन्न

Currants of all colors are rich in nutrients
सर्वच रंगांचे बेदाणे पोषक तत्त्वांनी संपन्नPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली ः सुका मेवा हा आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरत असतो. त्यामध्ये बेदाण्यांचा समावेश होतो. बेदाणे अनेक रंगांमध्ये उपलब्ध असतात. सर्वच रंगांमधील हे बेदाणे पोषक तत्त्वांनी संपन्न असतात, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी हे बेदाणे लाभदायक ठरतात.

सोनेरी किंवा पिवळ्या रंगाच्या बेदाण्यांमध्ये फायबर, पोटॅशियम आणि आयर्न अधिक प्रमाणात असते. भारतात सर्वाधिक वापर याच बेदाण्यांचा होत असतो. या बेदाण्यांमध्ये नैसर्गिक शर्करेचे प्रमाणही अधिक असते. या बेदाण्यांच्या सेवनाने शरीराला भरपूर प्रमाणात फायबर मिळते. त्याच्या सेवनाने पचन संस्था चांगली होते व बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत मिळते. तसेच शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठीही हे बेदाणे गुणकारी आहेत. हिरवे बेदाणे रसदार आणि कोमल असतात. तसेच ते पातळ आणि लांबट आकाराचेही असतात. हिरव्या बेदाण्यांमध्ये फायबर, वेगवेगळी जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर मात्रेत असतात. हा आयर्न म्हणजेच लोहतत्त्वाचाही एक चांगला स्रोत आहे. हिरवे बेदाणे खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठीही हे बेदाणे गुणकारी आहेत. काळे बेदाणे किंवा मनुक्यांमध्ये फायबर, आयर्न आणि पोटॅशियमसारखे पोषक तत्त्वे असतात. काळ्या बेदाण्यांच्या सेवनाचा आतड्यांच्या आरोग्याला विशेष लाभ होतो. या बेदाण्यांच्या सेवनाने पोटातील आरोग्यदायी बॅक्टेरियांचे प्रमाण वाढते. या बेदाण्यांमध्येही आयर्न अधिक असते. त्याचा केसांना लाभ मिळतो. लाल बेदाणे हे स्वादिष्ट असतात व ते अधिक मुलायमही असतात. त्यांना ‘फ्लेम रायसिन’ असेही म्हटले जाते. हे बेदाणे लाल द्राक्ष्यांपासून बनवले जातात. त्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंटस् अधिक प्रमाणात असतात. शिवाय ‘सी’ जीवनसत्त्वही यामध्ये मोठ्या प्रमाणात असते. लाल बेदाणे दातांमधील कॅव्हिटी आणि हिरड्यांच्या आजारावर गुणकारी ठरतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news