50 हून अधिक रेडीमेड प्रॉम्प्टस् वापरून बनवा परफेक्ट व्हिडीओ!

‘मेटा’ने सादर केले नवीन स्मार्ट व्हिडीओ एडिटिंग फीचर
create-perfect-video-using-over-50-ready-made-prompts
50 हून अधिक रेडीमेड प्रॉम्प्टस् वापरून बनवा परफेक्ट व्हिडीओ!Pudhari File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : व्हिडीओ एडिटिंग ही नेहमीच एक जटिल प्रक्रिया मानली जाते. विशेषतः, ज्यांना तांत्रिक ज्ञान कमी आहे, त्यांच्यासाठी हे काम अधिक कठीण असते; पण आता ‘मेटा एआय’ने या अडचणीला सोपा पर्याय दिला आहे. ‘मेटा’ने आपले नवीन स्मार्ट व्हिडीओ एडिटिंग फीचर सादर केले असून, यामुळे अगदी नवशिक्यांनाही प्रोफेशनल दर्जाचे व्हिडीओ तयार करता येणार आहेत, तेही केवळ टेक्स्ट कमांडस् वापरून! ‘मेटा एआय’च्या या नव्या फीचरचे नाव आहे प्रॉम्प्टस्. यात वापरकर्ते आपला व्हिडीओ अपलोड करतात आणि त्यानंतर 50 हून अधिक तयार असलेल्या प्रॉम्प्टस् म्हणजेच टेक्स्ट कमांडस्च्या साहाय्याने हव्या त्या बदलांना अंमलात आणू शकतात.

सध्या हे फीचर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, भविष्यात ‘मेटा’कडून यासाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन मॉडेल सादर केले जाऊ शकते. यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही; परंतु वापरकर्त्यांमध्ये याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘मेटा’च्या मते, हे फीचर प्रामुख्याने क्रिएटर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्स, तसेच स्मॉल बिझनेस ओनर्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

व्हिडीओे कंटेंट तयार करण्याची गरज असलेल्या प्रत्येकासाठी आता कंटेंट तयार करणे अधिक सोपे होणार आहे. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांची बचत होणार आहे. ‘मेटा’ च्या तांत्रिक टीमनुसार, ‘आम्ही नेहमीच ‘एआय’च्या मदतीने लोकांना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात मदत करण्याचा प्रयत्न करतो. हे नवीन ‘एआय’ व्हिडीओे एडिटिंग टूल आमच्या त्या प्रयत्नांचा पुढील टप्पा आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती सहजपणे प्रोफेशनल दर्जाचे व्हिडीओ तयार करू शकेल.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news