चक्क मातीचा वापर करून कोरोनाचे निदान

आयआयटी गुवाहाटीचे नवे संशोधन
covid-diagnosis-using-clay-based-technology
चक्क मातीचा वापर करून कोरोनाचे निदानPudhari File Photo
Published on
Updated on

गुवाहाटी : देशात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना डॅशबोर्डवर दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 391 नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे आता कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 5,755 झाली आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसत असली तरी बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत, त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही. तरीही, सर्व लोकांनी सतत बचावात्मक उपाय करत राहणे आवश्यक आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या दरम्यान, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) गुवाहाटीच्या संशोधकांनी कोरोना चाचणीचा एक नवीन आणि स्वस्त मार्ग शोधला आहे. कोव्हिड-19 रोगाचे कारण बनणार्‍या सार्स-सीओव्ही-2 चा शोध घेण्यासाठी त्यांनी चक्क मातीचा वापर केला आहे.

संशोधकांना असे आढळले आहे की, मातीचे कण ‘कोव्हिड’ला कारणीभूत होणार्‍या ‘सार्स-कोव्ह-2’ या कोरोना विषाणूच्या उपस्थितीत वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. हा शोध एक सोपा, स्वस्त चाचणी पर्याय विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जर्नल ‘अप्लाईड क्ले सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी सांगितले की, मातीचे कण विषाणू असलेल्या खारट-पाण्याच्या द्रावणात लवकर तळाशी बसतात. विषाणूच्या उपस्थितीमुळे मातीच्या इंटर पार्टिकल फोर्समध्ये बदल झाल्यामुळे, मातीच्या इलेक्ट्रोलाईट प्रणालीचा सेडिमेंटेशन दर बदलला. ‘सेडिमेंटेशन’ ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये द्रव किंवा वायूमध्ये विरघळलेले कण गुरुत्वाकर्षण किंवा इतर शक्तींमुळे द्रवामधून बाहेर पडतात. टीमने म्हटले आहे की, हे निष्कर्ष विषाणू शोधण्यासाठी सध्या वापरल्या जाणार्‍या जटिल, महागड्या पद्धतींच्या तुलनेत सोपे आणि स्वस्त पर्याय असू शकतात.

आयआयटी गुवाहाटीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे प्रोफेसर आणि प्रमुख लेखक टी.व्ही. भरत म्हणाले, ‘कोव्हिडच्या चाचणीसाठी वापरल्या जाणार्‍या पीसीआरसारख्या सध्याच्या पद्धती अत्यंत संवेदनशील आहेत; परंतु त्यास वेळ लागतो आणि उपकरणांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे, अँटिजेन चाचणी जलद आहे; परंतु अचूकता कमी आहे, तर अँटिबॉडी चाचणीचा उपयोग संसर्ग झाल्यानंतर केला जातो. संशोधकांनी या चाचणीसाठी ‘बेंटोनाईट माती’चा वापर केला आहे, कारण तिची अद्वितीय रासायनिक रचना प्रदूषके आणि जड धातू सहजपणे शोषून घेण्यास मदत करते. संशोधकांनी सांगितले की, यापूर्वीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मातीचे कण विषाणू आणि बॅक्टेरियोफेजमुळे स्थिर होऊ शकतात, ज्यामुळे ते विषाणू शोधण्यासाठी एक आशादायक सामग्री बनते. आम्ही या शोधाबद्दल खूप आशावादी आहोत.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news