चीनमध्ये किड्यांपासून बनवली कोरोना लस! | पुढारी

Published on

बीजिंग : चिन्यांच्या आहारात माणूस वगळता काहीही असू शकतेे. वटवाघूळ, ऑक्टोपस, साप, बेडूक, कुत्रा, मांजर आणि किडेही चिनी लोक मिटक्या मारत खातात. आता जगाला कोरोनाची 'देणगी' दिल्यानंतर चीनमध्ये यावर लस शोधली जात आहे. त्यासाठी चक्‍क किड्यांपासून लस विकसित केली जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या लसीची मानवावर चाचणी घेण्यास तिथे परवानगी देण्यात आली आहे.

या लसीची माहिती चंगडू शहराच्या स्थानिक प्रशासनाने दिली आहे. शहर प्रशासनाने सोशल मीडिया 'व्ही-चॅट'वर एक नोटीस शेअर केली आहे. त्यानुसार या लसीसाठी किड्यांच्या पेशींचा वापर करून प्रोटिन बनवण्यात आले आहे. सिचुआन युनिव्हर्सिटीच्या वेस्ट चायना हॉस्पिटलमध्ये ही लस तयार करण्यात आली आहे. या लसीला 'नॅशनल मेडिकल प्रॉडक्टस् अ‍ॅडमिनिस्ट्रेशन'ने क्‍लिनिकल ट्रायलची परवानगी दिली आहे. किड्यांचा वापर करून बनवली जाणारी ही चीनमधील पहिलीच लस आहे.

चीनमधील संशोधक आठ संभाव्य लसींवर सध्या काम करीत आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या स्तरांतील क्‍लिनिकल चाचण्या सुरू आहेत. चीनमधील कॅन्सिनो बायोलॉजिक्स ही कंपनीही लस बनवली आहे. तिला 'एडी 5-एनकोव्ह' असे नाव देण्यात आले आहे. या लसीला पेटंटही देण्यात आले आहे. यावर्षीच्या अखेरपर्यंत ही लस बाजारात येऊ शकते. चीनमधील आणखी एक खासगी कंपनी 'सिनोवॅक बायोटेक'ही कोरोनावरील लस बनवत आहे. त्यांची लस चाचणीच्या तिसर्‍या म्हणजेच अंतिम टप्प्यात आली आहे. तिला 'कोरोनाव्हॅक' असे नाव देण्यात आले आहे. सध्या ब—ाझीलमध्ये नऊ हजार लोकांवर या लसीची चाचणी सुरू आहे. चीनमधील अन्य एक फार्मा कंपनी 'सिनोफार्म' ने अलीकडेच म्हटले होते की या वर्षीच्या अखेरपर्यंत कंपनी कोरोनावरील लस आणेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news