Type1 Diabetes Risk : टाईप 1 मधुमेहाचा धोका ओळखण्यासाठी बाळाच्या नाळेतील रक्त ठरू शकते उपयुक्त

‘नेचर कम्युनिकेशन्स’मधील अहवालातून महत्त्वाची माहिती
Type1 Diabetes Risk
टाईप 1 मधुमेहाचा धोका ओळखण्यासाठी बाळाच्या नाळेतील रक्त ठरू शकते उपयुक्त
Published on
Updated on

नवी दिल्ली : जन्माच्या वेळी नाळेतून (अंबिलिकल कॉर्ड) गोळा केलेले रक्‍त भविष्यात बालकांना टाईप १ मधुमेह होण्याचा धोका किती आहे, याचे महत्त्वाचे संकेत देऊ शकते, अशी माहिती एका महत्त्वपूर्ण संशोधनातून असे समोर आली आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. शास्‍त्रज्ञांनी नाळेच्या रक्‍तामध्ये अशा काही विशिष्ट प्रथिनांचा (प्रोटिन्स) शोध लावला आहे, त्यांची पातळी भविष्यात होणाऱ्या मधुमेहाशी संबंधित आहे. यामध्ये आयडीएस आणि एचएलए-डीआरए ही दोन प्रथिने मधुमेहाचा धोका ओळखण्यासाठी सर्वाधिक प्रभावी ठरली आहेत.

टाईप १ मधुमेहाशी संबंधित जैविक बदल गर्भावस्थेदरम्यानच सुरू होऊ शकतात. हे संकेत बालकाच्या जन्माच्या वेळी नाळेच्या रक्‍तामध्ये ओळखता येतात, अशी नवी माहिती या संशोधनातून पुढे आली आहे. काही प्रकरणांमध्ये, गर्भावस्थेत आईचा ‌‘पीएफएएस‌’ (मानवनिर्मित रसायनांचा गट) सारख्या फॉरेव्हर केमिकल्सशी आलेला संपर्कही या बदलांना कारणीभूत असू शकतो. सध्या मधुमेहाचे स्क्रीनिंग हे आनुवंशिक चाचण्यांवर अवलंबून असते, जे आजार बळावल्यानंतरच समजते. मात्र, नाळेच्या रक्‍तातील प्रथिनांच्या तपासणीमुळे मधुमेहाचा धोका खूप लवकर ओळखता येणे शक्य होणार आहे. शास्‍त्रज्ञांच्या मते, हा शोध म्हणजे केवळ एक शक्यता आहे, नशीब नव्हे. जर सुरुवातीच्या काही वर्षांत प्रथिनांचे हे असंतुलन योग्य जीवनशैली किंवा उपचारांनी सुधारले, तर भविष्यातील मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. यावर अधिक सखोल संशोधन होणे अद्याप बाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news