‘रीसेट, रीचार्ज’साठी दिली 9 दिवसांची भरपगारी सुट्टी!

नो लॅपटॉप, नो मीटिंग, नो ई-मेल आणि नो कॉल अशी ही सुट्टी असणार
company offers 9-day paid leaves to all employees as 'Reset and Recharge' break
‘रीसेट, रीचार्ज’साठी 9 दिवसांची भरपगारी सुट्टी दिली. Pudhari File Photo
Published on
Updated on

न्यूयॉर्क : ऑफिसमधून एक दिवस सुट्टी घेणेही अनेकांना शक्य होत नाही. काहींना तर दसरा, दिवाळीसारख्या सणांनादेखील सुट्टी नसते. अनेकदा सुट्टीच्या दिवशीही कर्मचार्‍यांना ऑफिसमधून ई-मेल, एसएमएस येत राहतात. पण, एका कंपनीने त्यांच्या कर्मचार्‍यांना चक्क सलग नऊ दिवस सुट्टी दिली आहे. नो लॅपटॉप, नो मीटिंग, नो ई-मेल आणि नो कॉल अशी ही सुट्टी असणार आहे.

अमेरिकेतील शॉपिंग साईट मीशोने त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांसाठी सलग नऊ दिवस सुट्टी देण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत लिंक्डईन अकाऊंटवर ही माहिती दिली. कंपनीने या सुट्टीला ‘रीसेट आणि रीचार्ज’ ब्रेक असे नाव दिले. 26 ऑक्टोबर 2024 ते 4 नोव्हेंबर 2024 अशी सलग नऊ दिवस ही सुट्टी असणार आहे. या सुट्टीच्या काळात कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांना नो लॅपटॉप, नो मीटिंग, नो ई-मेल, नो मेसेज असे धोरण लागू केले गेले आहे. कंपनीच्या या लिंक्डईन पोस्टला खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

पोस्टमध्ये कंपनीने पुढे म्हटले आहे की,‘या वर्षी केलेले प्रयत्न आणि आमच्या यशस्वी मेगा ब्लॉकबस्टर विक्रीनंतर आता वेळ आली आहे की, आम्ही स्वतःला कामापासून पूर्णपणे वेगळे करून स्वतःवर लक्ष केंद्रित करावे. मन आणि शरीर ताजेतवाने करण्यासाठी आणि आगामी वर्षाची नवीन आणि उत्साही सुरुवात करण्यासाठी हा रीचार्ज ब्रेक उपयुक्त ठरेल.’

मीशो कंपनीच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडत आहे. या पोस्टवर आतापर्यंत 19549 रिअ‍ॅक्शन, 477 कमेंट आल्या असून, ही पोस्ट 250 पेक्षा जास्त वेळा री-पोस्ट करण्यात आली आहे. अनेकांनी यावर सकारात्मक कमेंट दिल्या आहेत. एक यूजरने लिहिले आहे, ‘व्वा मीशो, नऊ दिवसांचे रीचार्ज! आराम करा. कारण तुमच्या बॉसने सर्व गोष्टींची काळजी घेतली आहे. त्या ही सर्व ऑटोमेटेड ऑर्डर आणि रिटर्नसह, तुम्हाला असे वाटेल की ते वर्षभर सुट्टीवर गेले आहेत! आमच्यापैकी काही अजूनही येथे काम करीत आहेत.’ तर दुसर्‍या एका यूजरने लिहिले आहे की, ‘कर्मचार्‍यांना 9 दिवसांची सुट्टी? मीशो हा केवळ ग्रीन फ्लॅग नाही, तर ग्रीन फॉरेस्ट आहे! हा माझ्यासाठी ड्रीम कंपनी गोल आहे!’

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news