Colorful Waves | बहामासमध्ये समुद्राच्या तळाशी पेंटिंगसारख्या रंगीबेरंगी लहरी

अंतराळातून दिसले पृथ्वीचे अद्भु‌त रूप!
Colorful Waves |
Colorful Waves | बहामासमध्ये समुद्राच्या तळाशी पेंटिंगसारख्या रंगीबेरंगी लहरी
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आपली पृथ्वी अंतराळातून जितकी सुंदर दिसते, तितकेच तिचे अनेक नयनरम्य रंग अजूनही शास्त्रज्ञांना अचंबित करत आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ आणि इतर उपग्रहांनी नुकतेच बहामास जवळील समुद्राचे विहंगम दृश्य टिपले आहे. अंतराळातून पाहिल्यास समुद्राच्या प्राचीन तळावर एखाद्या कलाकाराने कॅनव्हासवर हुबेहूब पेंटिंग काढल्यासारख्या रंगीबेरंगी अद्भुत लहरी (Ripples) आणि नक्षीकाम दिसून येत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हे केवळ निसर्गाचे सौंदर्य नसून समुद्राच्या तळाशी असलेल्या एका प्राचीन रचनेचा हा भाग आहे.

समुद्राच्या उथळ पाण्याखाली असलेल्या वाळूच्या टेकड्या आणि महासागराच्या प्रवाहांच्या सततच्या हालचालींमुळे हे सुंदर नक्षीकाम तयार झाले आहे. पाण्याचा हलका निळा, गडद निळा आणि हिरवट रंग यामुळे या लहरींना त्रिमितीय (3D) पेंटिंगसारखे स्वरूप आले आहे. हा परिसर प्रामुख्याने चुनखडी आणि पांढऱ्या वाळूने बनलेला उथळ पाण्याचा भाग आहे. समुद्रात येणाऱ्या शक्तिशाली भरती-ओहोटीच्या प्रवाहामुळे वाळूचे कण एका विशिष्ट पद्धतीने रचले जातात, ज्यामुळे या महाकाय लहरी किंवा लाटांसारखे नमुने तयार होतात. शास्त्रज्ञांच्या मते, समुद्राच्या तळाचा हा भाग हजारो वर्षांपासून अशाच प्रकारे बदलत राहिला आहे आणि पृथ्वीच्या भौगोलिक इतिहासाचा तो एक महत्त्वाचा पुरावा आहे. अंतराळातून घेतलेली ही छायाचित्रे केवळ विज्ञानाच्या दृष्टीनेच नव्हे, तर निसर्गाच्या अद्भुत कलाकुसरीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून जगभरात कौतुकाचा विषय ठरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news