2000 year old coin | बस तिकिटासाठी दिलेले ‘ते’ नाणे निघाले 2,000 वर्षे जुने!

लिड्समधील आश्चर्यकारक घटना
2000 year old coin |
2000 year old coin | बस तिकिटासाठी दिलेले ‘ते’ नाणे निघाले 2,000 वर्षे जुने!
Published on
Updated on

लिड्स (इंग्लंड) : बसचे भाडे म्हणून प्रवाशाने दिलेले एक साधे नाणे प्रत्यक्षात 2 हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचे दुर्मीळ चलन असल्याचे समोर आले आहे. संशोधकांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, या शोधामुळे इतिहासप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

हे दुर्मीळ नाणे 1950 च्या दशकात जेम्स एडवर्डस् यांच्या हाती आले होते. एडवर्डस् त्यावेळी ‘लिड्स ट्रान्सपोर्ट कंपनी’मध्ये मुख्य रोखपाल म्हणून कार्यरत होते. बस आणि ट्राम चालकांकडून जमा झालेल्या चिल्लरमध्ये अनेकदा खोटी किंवा परदेशी नाणी येत असत. एडवर्डस् अशी नाणी बाजूला काढून त्यांचे नातू पीटर यांना खेळायला देत असत. पीटर यांनी गेल्या 70 वर्षांपासून ही नाणी अत्यंत जपून ठेवली होती. 77 वर्षांच्या पीटर यांनी सांगितले, माझ्या आजोबांना जेव्हा ब्रिटिश नसलेली नाणी सापडत, तेव्हा ते ती बाजूला काढत आणि मी त्यांच्या घरी गेल्यावर मला देत.

कदाचित दुसर्‍या महायुद्धानंतर परतलेल्या सैनिकांनी ही परदेशी नाणी आणली असावीत. पीटर यांना या नाण्यांवरील चित्र आणि मजकुराबद्दल नेहमीच उत्सुकता होती. त्यांनी जेव्हा या नाण्याचा इतिहास शोधला, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. हे नाणे इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील असून, ते स्पेनमधील ‘कॅडिझ’ शहरात कार्थेजियन संस्कृतीद्वारे तयार करण्यात आले होते. या नाण्यावर एका बाजूला ‘मेलकार्ट’ या देवतेचा चेहरा आहे, जो ग्रीक नायक ‘हर्क्युलिस’सारखा दिसतो. नाण्याच्या दुसर्‍या बाजूला त्या काळातील व्यापार्‍यांना आकर्षित करण्यासाठी ग्रीक शैलीतील चित्रे यावर कोरलेली आहेत.

या नाण्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात आल्यानंतर पीटर यांनी ‘लिड्स म्युझियम्स अँड गॅलरीज’शी संपर्क साधला आणि हे नाणे संग्रहालयाला दान करण्याचा निर्णय घेतला. पीटर म्हणाले, हे नाणे नेमके कुठले आहे हे ओळखणे कठीण होते. पण त्याचा इतिहास समजल्यानंतर मला ते अभ्यासासाठी योग्य ठिकाणी द्यावेसे वाटले. माझे आजोबा जिथे काम करायचे, त्याच शहरात (लिड्स) हे नाणे पुन्हा संग्रहालयाच्या रूपाने परत येत आहे, याचा मला अभिमान वाटतो. मात्र, हे नाणे एका बसच्या तिकिटासाठी कोणाकडे आणि कसे पोहोचले, हे गुपित कायम राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news