Climate change earth rotation | हवामान बदलामुळे पृथ्वीची गती मंदावली

दिवसाचा कालावधी वाढतोय
Climate change earth rotation |
Climate change earth rotation | हवामान बदलामुळे पृथ्वीची गती मंदावलीVanessa A Jewell
Published on
Updated on

झुरिच (स्वित्झर्लंड): हवामान बदलाचा परिणाम केवळ तापमानावरच नाही, तर आता थेट पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवरही होत असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. मानवनिर्मित हवामान बदलामुळे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती गेल्या 36 लाख वर्षांतील सर्वाधिक वेगाने मंदावत आहे. वाढत्या समुद्र पातळीमुळे दर शतकात दिवसाची लांबी 1.33 मिलिसेकंदने वाढत आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, हे एखाद्या ‘फिगर स्केटर’च्या (बर्फावर नाचणारे खेळाडू) हालचालींसारखे आहे. जेव्हा स्केटर आपले हात शरीराच्या जवळ घेतो, तेव्हा त्याचा फिरण्याचा वेग वाढतो; मात्र हात पसरल्यावर वेग मंदावतो. अगदी तसेच, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून त्याचे पाणी विषुववृत्ताच्या दिशेने पसरत असल्याने पृथ्वीचे वस्तुमान विखुरले जात आहे. यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होत आहे. पृथ्वीच्या परिवलनावर (स्वतःभोवती फिरणे) अनेक नैसर्गिक घटकांचा परिणाम होतो: चंद्राचे गुरुत्वाकर्षण: चंद्राच्या ओढीमुळे पृथ्वीचा वेग दर शतकात साधारण 2.4 मिलिसेकंदने कमी होतो.

ग्लेशियल आयसोस्टॅटिक अ‍ॅडजस्टमेंट : बर्फाचा थर हटल्यानंतर पृथ्वीचे कवच हळूहळू वर येते, ज्यामुळे दिवसाची लांबी दर शतकात 0.8 मिलिसेकंदने कमी होते. एल निनो : शक्तिशाली वार्‍यांमुळेही फिरण्याचा वेग अल्प काळासाठी मंदावतो. स्वित्झर्लंडमधील ‘ETH झुरिच’ येथील भूशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सह-लेखक मोस्तफा कियानी शाहवंदी यांच्या मते, अलीकडच्या वर्षांत हवामानाची भूमिका अत्यंत वाढली आहे. ते म्हणतात, ‘आम्हाला हे जाणून घ्यायचे होते की, ही घटना नैसर्गिक आहे की असामान्य? संशोधनाअंती असे आढळले की, हे बदल अत्यंत वेगवान आणि मानवनिर्मित (Anthropogenic) आहेत.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news