China household robots | घरातील कामांसाठी आता चिनी रोबो सज्ज

जेवण बनवण्यापासून साफसफाईपर्यंत सर्व कामे करणार!
China household robots
China household robots | घरातील कामांसाठी आता चिनी रोबो सज्ज
Published on
Updated on

बीजिंग : चिनी तंत्रज्ञान कंपनी UniX AI ने आपल्या ‘पँथर’ सीरिज अंतर्गत एक नवीन होम रोबो लाँच केला आहे. हा रोबो घरातील दैनंदिन कामे अतिशय कौशल्याने करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. हा रोबो घरातील लोकांना वेळेवर झोपेतून उठवू शकतो, त्यांच्यासाठी जेवण बनवू शकतो आणि घर स्वच्छ ठेवू शकतो. इतकेच नाही, तर अस्ताव्यस्त पडलेले सामान व्यवस्थित लावण्याची क्षमताही यात आहे.

या रोबोची उंची साधारण 5 फूट 3 इंच असून, वजन 176 पाऊंड (सुमारे 80 किलो) आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा रोबोट 8 ते 16 तास सतत काम करू शकतो. दोन पायांच्या ह्युमनॉइड रोबोटस्च्या तुलनेत UniX AI ने या रोबोटला ‘व्हील्ड बेस’ (चाके असलेला पाया) दिला आहे. यामुळे रोबो अधिक स्थिर राहतो आणि ऊर्जेचीही बचत होते. घरामध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये सहज वावरण्यासाठी हे डिझाईन अत्यंत उपयुक्त ठरत आहे. हा रोबो ‘एम्बोडीड AI’ सिस्टीमवर आधारित आहे. याचा अर्थ असा की, हे तंत्रज्ञान केवळ आभासी नसून प्रत्यक्ष भौतिक जगात काम करण्यास सक्षम आहे.

सध्या या रोबोची खर्‍या घरांमधील वातावरणात चाचणी घेतली जात आहे. या रोबोमध्ये प्रगत ‘परसेप्शन सिस्टीम’ देण्यात आली आहे. यात दोन RGB आणि RGB- D कॅमेरे आहेत. अचूक हालचालींसाठी 3डी लिडार तंत्रज्ञान वापरले आहे. लोकांशी संवाद साधण्यासाठी सहा मायक्रोफोनची यंत्रणा यात आहे. या सेन्सर्स आणि कॅमेर्‍यांच्या मदतीने रोबो घरातील वस्तू ओळखू शकतो, अडथळे पार करून रस्ता शोधू शकतो आणि घरातील सदस्यांशी बोलू शकतो. भविष्यात घरगुती मदतीसाठी हा रोबो एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news